पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावून मायदेशी परतलेल्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडुंची भेट घेतली. यावेळी मोदींनी या सगळ्या खेळाडुंचे अभिनंदन केले. भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मंधनासाठी हा अनुभव खूपच खास ठरला. विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यांमध्ये स्मृतीने शतक झळकावले होते. कालच्या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट करून स्मृतीच्या शतकी खेळीचे कौतुक केले होते. दुखापत होऊनही मंधनाने विश्वचषकात उल्लेखनीय कामगिरी केली. इंग्लंडविरुद्धची तिची खेळी तर विलक्षण होती, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते. स्मृती मंधना एरवी सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्ह नसते. मात्र, काल खुद्द पंतप्रधानांनी ट्विट केले म्हटल्यावर तिनेही लगेच त्यांना रिप्लाय दिला. तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद. तुम्हाला भेटणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. तुम्ही देशासाठी ज्याप्रकारे काम करता ते आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मंधनाने म्हटले. विश्वचषकाच्या साखळी सामन्यांमधील कामगिरीने स्मृती मंधनाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मंधनाने ७२ चेंडूत ९० तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात १०६ चेंडूत १०८ धावा झळकावल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर स्मृती मंधना प्रचंड चर्चेत आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटला स्मृती मंधनाने दिला असा रिप्लाय
स्मृती मंधना एरवी सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्ह नसते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-07-2017 at 08:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti mandhana reply to pm narendra modi is winning hearts