नवी दिल्ली : आयर्लंडविरुद्धच्या आगामी तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची नियमित कर्णधार हमनप्रीत कौर आणि प्रमुख वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली आहे. हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत तारांकित फलंदाज स्मृती मनधाना नेतृत्वाची धुरा सांभाळेल.

या मालिकेतील सामने अनुक्रमे १०, १२ आणि १५ जानेवारीला राजकोट येथेच खेळवले जाणार आहेत. गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेदरम्यान हरमनप्रीतच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला दोन ट्वेन्टी-२० सामन्यांना मुकावे लागले होते. त्याआधी, गेल्या ऑक्टोबरमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान तिच्या मानेला दुखापत झाली होती. त्यामुळे आता भारतीय निवड समितीने तिला विश्रांती दिली आहे.

हेही वाचा >>>Harbhajan Singh on Team India: राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर आल्यानंतर ‘टीम इंडिया’ची वाताहात; हरभजन सिंगचा थेट हल्ला

संघ : स्मृती मनधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, उमा छेत्री (यष्टिरक्षक), रिचा घोष (यष्टिरक्षक), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कन्वर, टिटास साधू , सैमा ठाकोर, सायली सतघरे.

Story img Loader