Smriti Mandhana 28th Birthday : भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर स्मृती मानधना आज तिचा २८ वा वाढदिवस साजरा करत आहे. स्मृती नेहमीच तिच्या फलंदाजी आणि लूकमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करते. क्रिकेटच्या मैदानावर मानधना जितकी तिच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे, तितकीच ती मैदानाबाहेर सोशल मीडियावरही तितकीच लोकप्रिय आहे. ज्यामुळे तिचे चाहते तिला ‘नॅशनल क्रश’ असेही म्हणतात. तिचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत असतं. अशा परिस्थितीत स्मृती मानधना ज्या व्यक्तीला डेट करत आहे ती कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
स्मृती मानधना कोणाला डेट करते?
स्मृती मानधना पलाश मुच्छलबरोबर डेटिंग करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पलाश हा प्रसिद्ध बॉलिवूड गायिका पलक मुच्छलचा भाऊ आहे. स्मृती आणि पलाश अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघेही एकमेकांचा वाढदिवस एकत्र साजरा करतात. पलाश हा इंदूरचा रहिवासी असून स्मृती त्याच्याशीच लग्न करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. स्मृतीची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूसाठी निवड झाल्यानंतर लगेचच पलाश मुच्छलने इंस्टाग्रामवर तिच्यासाठी एक खास गोष्ट पोस्ट करून तिचे अभिनंदन केले होते.
पलाशने एका सार्वजनिक कार्यक्रमात स्मृतीबद्दलचे प्रेम व्यक्त केल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. पलाशने स्मृतीला बहिणीसमोर प्रपोज केले होते, त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा आणखी वाढली होती. त्याच वेळी, नुकतेच पलाशने मंधानासह केक कापतानाचे दोन फोटो शेअर केले होते, ज्यात त्याने कॅप्शनमध्ये हॅशटॅग ५ लिहिले होते आणि हार्टचा इमोजी शेअर केला होता. ज्यावरुन दोघे ५ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असल्याचा अंदाज जात आहे. मात्र, या दोन्ही सेलिब्रिटींनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा – MLC 2024 : धक्कादायक! वेगवान चेंडूने गोलंदाज रक्तबंबाळ; VIDEO पाहून चाहत्यांना फिलीप ह्यूजची आली आठवण
स्मृती मानधनाचा आतापर्यंतची कारकीर्द –
स्मृती मानधनाचा क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, तिने भारतीय महिला संघासाठी ७ कसोटी सामने खेळताना ६२९ धावा केल्या आहेत, ज्यात २ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचवेळी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिने ८५ सामने खेळताना ३५८५ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ७ शतके आणि २७ अर्धशतकांचा समावेश आहे. तिने १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३३२० धावा केल्या आहेत.