IND-W vs WI-W: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत ३१४ धावा केल्या. टीम इंडियाच्या मोठ्या धावसंख्येमध्ये स्मृती मानधनाचे मोठे योगदान. या सामन्यात तिने ९१ धावांची खेळी खेळली. मानधनाने पहिल्या विकेटसाठी प्रतिका रावतसह ११० धावांची आणि हरलीन देओलबरोबर दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली, या सामन्यात तिचे शतक हुकले. मात्र तिने एक विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
स्मृती मानधनाचा विश्वविक्रम
भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. मानधना प्रत्येक सामन्यात एकापेक्षा एक विविध विक्रम आपल्या नावे करत आहे. दरम्यान, पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान तिने एक विक्रम केला आहे. महिलांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारी ती फलंदाज ठरली आहे. तिने २०२४ मध्ये आतापर्यंत १६०२ धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्डच्या नावावर होता. यंदाही तिने हा विक्रम केला आहे. २०२४ मध्ये त्याच्या नावावर एकूण १५९३ धावांची नोंद आहे.
हेही वाचा – PAK vs SA: पाकिस्तान संघाने एकतर्फी मालिका विजय मिळवत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू
स्मृती मानधना – १६०२ धावा (वर्ष २०२४)
लॉरा वोल्वार्ड – १५९३ धावा (२०२४)
नेट सेव्हियर ब्रंट – १३४६ धावा (२०२२)
स्मृती मानधना – १२९१ धावा (वर्ष २०१८)
स्मृती मानधना – १२९० धावा (वर्ष २०२२)
भारतीय स्टार स्मृती मानधना जबरदस्त फॉर्ममध्ये परतली आहे. टीम इंडियासाठी खेळलेल्या गेल्या पाच सामन्यांमध्ये तिने अप्रतिम फलंदाजी केली आहे. ज्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने १०५ धावांची इनिंग खेळली होती. यानंतर, वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२० मध्ये ५४ धावा, दुसऱ्या टी-२० मध्ये ६२ धावा आणि तिसऱ्या टी-२० मध्ये ७७ धावा केल्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मंधानाने ९१ धावांची खेळी केली.