Smriti Mandhana’s reaction on Harmanpreet Kaur’s dismissal: बांगलादेश आणि भारतीय महिला संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बरोबरीत राहिला. यासह दोन्ही संघांमधील मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २५५ धावा केल्या होत्या. २२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ ४९.३ षटकांत २२५ धावांवर आटोपला. या सामन्यानंतर स्मृती मंधानाने हरमनप्रीतचा एलबीडब्ल्यू आऊटवर आणि सुपर ओव्हरववर प्रतिक्रिया दिली.
अशा घटना आपण यापूर्वीही पाहिल्या आहेत – स्मृती मंधाना
डावाच्या ३४व्या षटकात कर्णधार हरमनप्रीत कौरला अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट घोषित केले. यानंतर हरमनप्रीत मैदानात संताप व्यक्त करताना दिसली. हरमनप्रीत कौरने आपली बॅट स्टंपवर मारली. स्मृती मानधना सांगते की, याआधीही क्रीडा क्षेत्रात असे घडले आहे. क्रिकबझवर बोलताना स्मृती मंधाना म्हणाली, ‘मध्यभागी जे घडले ते खेळाचा अविभाज्य भाग आहे. आपण पुरुषांचे क्रिकेट सामने पाहताना अशा घटना यापूर्वीही पाहिल्या आहेत.”
अंपायरच्या निर्णयांबाबत स्मृती मंधाना म्हणाली की, भविष्यात भारत-बांगलादेश मालिकेत तटस्थ पंचांचा समावेश केला पाहिजे. विशेषत: या मालिकेदरम्यान डीआरएस उपलब्ध नव्हता. स्मृती मंधाना म्हणाली, ‘मला वाटते की कोणत्याही सामन्यात, कधी कधी असे होते आणि तुम्ही अशा निर्णयांवर खूश नसता.’ स्मृती पुढे म्हणाली, “विशेषत: जेव्हा सामन्यात डीआरएस नसतो, तेव्हा मी काही निर्णयांच्या बाबतीत अंपायरिंगची एक चांगली पातळी असावी म्हणेन. कारण ते अगदी स्पष्ट होते, जेव्हा चेंडू पॅडवर आदळत होता, आमचे फलंदाज फलंदाजी करत होते, तेव्हा याचा विचारही केला नव्हता.”
आयसीसी, बीसीबी आणि बीसीसीआय चर्चा करेल – स्मृती मंधाना
स्मृती मंधाना पुढे म्हणाली, ‘त्याचवेळी, असा निर्णय घेणे आयसीसी आणि अंपायरिंग पॅनेलवर अवलंबून होते. पण होय, मला वाटते की हे सर्व एक अविभाज्य भाग आहेत आणि आम्ही सर्वकाही आमच्या पद्धतीने घेऊ. ती (हरमनप्रीत कौर) प्रत्येक गोष्टीबाबत थोडी सकारात्मक होण्याचा प्रयत्न करत आहे. मला खात्री आहे की आयसीसी, बीसीबी आणि बीसीसीआय यावर अधिक चर्चा करतील.’