कोणतीही व्यक्ती कायस्वरूपी मित्र आणि शत्रू नसते, हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राजकारणाचे ब्रीदवाक्य आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि भारतीय राजकारणातील निष्णात नेते शरद पवार यांचे शत्रुत्व संपले असून, आता त्यांच्या युतीची चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारतीय क्रिकेटमध्ये नवे गणित दिसून आल्यास आश्चर्य वाटण्याचे मुळीच कारण नाही.
श्रीनिवासन बीसीसीआयच्या सध्याच्या कार्यपद्धतीमुळे चिंतेत सापडले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आपले सख्खे शत्रू शरद पवार यांच्याशीच जुळवून घेतल्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पवार आणि श्रीनिवासन गटाचे वैर ऐरणीवर होते. श्रीनिवासन यांनी जगमोहन दालमिया यांच्यावर विश्वास टाकून त्यांना अध्यक्षपदावर विराजमान करण्यात धन्यता मानली. परंतु बीसीसीआयचा दैनंदिन कारभार दालमिया यांचा मुलगा अविषेक पाहू लागल्यामुळे दालमिया यांची चिंता वाढू लागली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन आणि पवार यांनी दूरध्वनीद्वारे एकमेकांशी चर्चा केली. या चर्चेत श्रीनिवासन यांनी पवार यांच्यासोबत मैत्रीचा हात पुढे केला आणि तुमच्यासोबत कार्य करायला मला आवडेल, असे म्हटले.
दालमिया यांना अध्यक्षपद मिळाल्यापासून अविषेक सर्व कारभारात लक्ष घालू लागला आहे. श्रीनिवासन यांना मात्र हे अजिबात आवडलेले नाही. बीसीसीआयच्या विविध समित्यांची आखणी करतानाही श्रीनिवासन यांना विचारात घेण्यात आले नाही, त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे चिंताग्रस्त श्रीनिवासन यांनी विश्वचषक स्पध्रेसाठी ऑस्ट्रेलिया गाठताच पवार यांच्याशी संवाद साधला.
जावई गुरुनाथ मयप्पन सट्टेबाजीत दोषी आढळल्यामुळे आणि हितसंबंधाचे आरोप झाल्यामुळे श्रीनिवासन यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. अशा बिकट परिस्थितीत नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या निवडणुकीत पवार आणि श्रीनिवास यांनी चांगली मोर्चेबांधणी केली. पवार यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून भाजपचा वरदहस्त असलेल्या राज्यांना हाताशी घेऊन अध्यक्षपदाचे सूत्र जुळवण्याचा प्रयत्न केला. परंतु विजयाची खात्री असल्याशिवाय पवार निवडणूक लढवत नाहीत, हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर श्रीनिवासन गटाने दालमिया यांना अध्यक्षपदावर बसवून कारभार चालवण्याचे समीकरण आखले. बीसीसीआयच्या सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत पवार गटाच्या अनुराग ठाकूर यांनी श्रीनिवासन यांच्या मर्जीतील संजय पटेल यांचा फक्त एका मताने पराभव केला होता. एक्स्प्रेस वृत्तसेवा, मुंबई
कोणतीही व्यक्ती कायस्वरूपी मित्र आणि शत्रू नसते, हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राजकारणाचे ब्रीदवाक्य आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्याध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि भारतीय राजकारणातील निष्णात नेते शरद पवार यांचे शत्रुत्व संपले असून, आता त्यांच्या युतीची चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारतीय क्रिकेटमध्ये नवे गणित दिसून आल्यास आश्चर्य वाटण्याचे मुळीच कारण नाही.
श्रीनिवासन बीसीसीआयच्या सध्याच्या कार्यपद्धतीमुळे चिंतेत सापडले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी आपले सख्खे शत्रू शरद पवार यांच्याशीच जुळवून घेतल्याचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पवार आणि श्रीनिवासन गटाचे वैर ऐरणीवर होते. श्रीनिवासन यांनी जगमोहन दालमिया यांच्यावर विश्वास टाकून त्यांना अध्यक्षपदावर विराजमान करण्यात धन्यता मानली. परंतु बीसीसीआयचा दैनंदिन कारभार दालमिया यांचा मुलगा अविषेक पाहू लागल्यामुळे दालमिया यांची चिंता वाढू लागली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन आणि पवार यांनी दूरध्वनीद्वारे एकमेकांशी चर्चा केली. या चर्चेत श्रीनिवासन यांनी पवार यांच्यासोबत मैत्रीचा हात पुढे केला आणि तुमच्यासोबत कार्य करायला मला आवडेल, असे म्हटले.
दालमिया यांना अध्यक्षपद मिळाल्यापासून अविषेक सर्व कारभारात लक्ष घालू लागला आहे. श्रीनिवासन यांना मात्र हे अजिबात आवडलेले नाही. बीसीसीआयच्या विविध समित्यांची आखणी करतानाही श्रीनिवासन यांना विचारात घेण्यात आले नाही, त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे चिंताग्रस्त श्रीनिवासन यांनी विश्वचषक स्पध्रेसाठी ऑस्ट्रेलिया गाठताच पवार यांच्याशी संवाद साधला.
जावई गुरुनाथ मयप्पन सट्टेबाजीत दोषी आढळल्यामुळे आणि हितसंबंधाचे आरोप झाल्यामुळे श्रीनिवासन यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागले होते. अशा बिकट परिस्थितीत नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या निवडणुकीत पवार आणि श्रीनिवास यांनी चांगली मोर्चेबांधणी केली. पवार यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून भाजपचा वरदहस्त असलेल्या राज्यांना हाताशी घेऊन अध्यक्षपदाचे सूत्र जुळवण्याचा प्रयत्न केला. परंतु विजयाची खात्री असल्याशिवाय पवार निवडणूक लढवत नाहीत, हे त्यांचे वैशिष्टय़ आहे. त्यामुळे अखेरच्या क्षणी पवार यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर श्रीनिवासन गटाने दालमिया यांना अध्यक्षपदावर बसवून कारभार चालवण्याचे समीकरण आखले. बीसीसीआयच्या सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत पवार गटाच्या अनुराग ठाकूर यांनी श्रीनिवासन यांच्या मर्जीतील संजय पटेल यांचा फक्त एका मताने पराभव केला होता.

Story img Loader