सलग चार वर्षे ‘फिफा’चा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या अर्जेटिनाच्या लिओनेल मेस्सीला तुरुंगवास घडण्याची शक्यता आहे. २००७ ते २००९ दरम्यान ३.४ दशलक्ष पौंड करचुकवेगिरी केल्याचे आरोप सिद्ध झाल्यास मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज होराको मेस्सी यांना सहा वर्षे तुरुंगवास आणि ४० दशलक्ष पौंड रकमेची शिक्षा घडू शकते.
ब्रिटन आणि स्वित्र्झलडमधील कंपन्यांची करचुकवेगिरी तसेच उरुग्वे आणि बेलिझमधील उत्पन्न दडवल्याचा आरोप मेस्सी आणि त्याच्या वडिलांवर ठेवण्यात आला आहे. गावा येथील न्यायालयात सरकारी वकीलाने दाखल केलेली याचिका मान्य केली असून, मेस्सीवर हे आरोप ठेवण्यात आले आहेत. मात्र मेस्सीने आपली चूक मान्य करून २४ दशलक्ष युरो इतकी रक्कम भरल्यास त्याला तुरुंगवासाची कारवाई टाळता येईल, असे स्पेनच्या कर विभागाचे म्हणणे आहे.
मेस्सीने मात्र आपण कोणतेही चुकीचे कृत्य केले नसल्याचे ‘ट्विटर’द्वारे म्हटले आहे. ‘‘कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नसल्यामुळे ही बातमी वाचून मला धक्काच बसला. आमच्या कर सल्लागाराच्या सल्ल्यानुसार आम्ही नियमितपणे कर भरत आलो आहोत,’’ असे स्पष्टीकरण मेस्सीने दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा