जागतिक सुवर्णपदक विजेता नेमबाज रंजन सोधी याला देशाच्या क्रीडा क्षेत्रातील ‘राजीव गांधी खेलरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासह १४ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
सोधीला सन्मानचिन्हासोबत साडेसात लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिच्यासह कविता चहाल, प्रौढ स्क्वॉशपटू जोत्स्ना चिनप्पा, हॉकीपटू सबा अंजुम, टेबल टेनिसपटू मौमा दास, कुस्तीपटू नेहा राठी, नेमबाज राजकुमारी राठोड, तिरंदाज चेक्रोवोलू स्वुरो, उदयोन्मुख गोल्फपटू गगनजित भुल्लर, बुद्धिबळपटू अभिजीत गुप्ता, स्नूकरपटू रुपेश शहा, कुस्तीपटू धर्मेदर दलाल, पॅरा अ‍ॅथलिट अमितकुमार सरोहा हे यंदा अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरले. पूर्णिमा महातो (तिरंदाजी), नरेंद्रसिंग सैनी (महिला हॉकी), राजसिंग(कुस्ती), के.पी.थॉमस (अ‍ॅथलेटिक्स), महावीरसिंग (बॉक्सिंग) या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जगराजसिंग मान (अ‍ॅथलेटिक्स), गुणदीपकुमार (हॉकी), विनोदकुमार (कुस्ती) व सुखबीर सिंग (पॅरास्पोर्ट्स) यांना ध्यानचंद पुरस्कार देण्यात आला.
रंजित महेश्वरीचा अर्जुन पुरस्कार रोखला
न्यूयॉर्क : अर्जुन पुरस्कार वितरण समारंभाला काही तास बाकी असताना आंतरराष्ट्रीय धावपटू रंजित महेश्वरीला पुरस्कारापासून रोखण्यात आले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या उत्तेजक चाचणीचा अहवाल उपलब्ध नसल्याने त्याला या पुरस्काराबाबत सोमवापर्यंत थांबावे लागणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने महेश्वरी याला शनिवारी हा पुरस्कार मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे. जरी उत्तेजक चाचणीत तो निदरेष असला तरी त्याला येथील समारंभात हा पुरस्कार मिळणार नाही व नंतर काही दिवसांनी हा पुरस्कार दिला जाईल, असेही या अधिकाऱ्याने महेश्वरीला कळविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा