कुस्तीसारख्या पारंपरिक खेळाचे स्थान कायम ठेवीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) या खेळाची शान वाढविली आहे. हा भारतीय मातीचाच विजय आहे असे ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता मल्ल सुशीलकुमार याने सांगितले.
सुशीलकुमार, योगेश्वर दत्त या ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंसह अनेक खेळाडू व संघटकांनी या निर्णयाचे स्वागत केले.
कुस्तीचे स्थान राहील याची आम्हाला खात्री होतीजेव्हा कुस्तीत भारतास ऑलिम्पिक पदकांच्या आशा उंचावल्या होत्या, त्याच वेळी या खेळाचे व पर्यायाने भारताच्या पदकांचे भवितव्य अंधारमय झाले होते. तथापि या निर्णयामुळे भारताच्या ऑलिम्पिक पदकांच्या आशा उंचावल्या गेल्या आहेत.
सुशीलककुमार, दोन ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू
कुस्ती क्षेत्रासाठी गणेश पावला आहे. या निर्णयामुळे आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य वाढले आहे. आता भारतीय खेळाडू उत्साहाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भाग घेतील व अधिकाधिक पदके मिळवीत देशाची शान वाढवतील. सध्या कनिष्ठ गटात असलेले खेळाडू भारताचे भावी आधारस्तंभ असतील.
काका पवार, छत्रपती पुरस्कार विजेते कुस्तीपटू
हा आमच्यासाठी अतिशय आनंददायी निर्णय आहे. ऑलिम्पिक समितीच्या निर्णयामुळे युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे. आता भारतास आगामी आठ वर्षांमध्ये किमान पाच ते सहा ऑलिम्पिक पदके या खेळात मिळतील अशी मला खात्री आहे.
योगेश्वर दत्त, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू
भारतीय कुस्ती क्षेत्राचा हा गौरव आहे. या खेळाचे ऑलिम्पिकमधील स्थान टिकण्यासाठी भारतीय खेळाडूंनी व संघटकांनी अहोरात्र प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
बाळासाहेब लांडगे, महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे सरचिटणीस
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा