भारताच्या सोमदेव देववर्मन याने दिल्ली ओपन एटीपी टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली मात्र त्याचा सहकारी साकेत मिनेनी याला पराभवास सामोरे जावे लागले. सोमदेव याने विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान मिळविणाऱ्या करुणोदयसिंग याला ६-२, ७-५ असे सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केले. हा सामना त्याने एक तासात जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये करुणोदय याने सोमदेवला चांगली लढत दिली. मात्र सोमदेवने जमिनीलगत सुरेख फटके मारून विजय मिळविला.
डेव्हिस चषक स्पर्धेत नुकतेच पदार्पण करणाऱ्या साकेतला इटलीच्या थॉमस फॅबिआनो याच्याविरुद्ध आव्हान टिकविता आले नाही. चुरशीने झालेला हा सामना थॉमसने ७-६ (७-४), ७-६ (७-४) असा जिंकला. दोन तास चाललेल्या या लढतीत साकेतने थॉमसला चिवट झुंज दिली. मात्र अनुभवाचा फायदा घेत थॉमसने विजय मिळविला.
एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धां
भारताच्या सोमदेव देववर्मन याने दिल्ली ओपन एटीपी टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली मात्र त्याचा सहकारी साकेत मिनेनी याला पराभवास सामोरे जावे लागले.
First published on: 19-02-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Somdev devvarman succeed to move towards second round of atp challenger competition