भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत दुसऱया फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सोमदेवचा इटलीच्या आंद्रेस सिप्पी याने पराभव केला.
सोमदेवने पहिल्याच सामन्यात दमदार विजय मिळवून दुसरी फेरी गाठली होती. दुसऱया फेरीत त्याच्यासमोर क्रमवारीत २०व्या स्थानी असलेल्या आंद्रेस सिप्पीचे आव्हान होते. दोन तास चाळीस मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिप्पीने सोमदेवचा ७-६, ६-४, ७-५ असा पराभव केला.

Story img Loader