भारतीय टेनिस महासंघाचे न खेळणारे कर्णधार व प्रशिक्षकापदावरून मला दूर करावे ही भारताचा कर्णधार सोमदेव देववर्मन याने केलेली मागणी हास्यास्पद आहे, असे प्रशिक्षक एस. पी. मिश्रा यांनी सांगितले.
सोमदेव याच्यासह भारतीय संघातील तरुण खेळाडूंनी संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. तसेच अनेक मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी मिश्रा यांना प्रशिक्षकपदावरून दूर करावे या मागणीचाही समावेश आहे.
भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून मिश्रा हे गेली अनेक वर्षे काम करीत आहेत. ते म्हणाले, सोमदेवने अशी मागणी करण्यापूर्वी माझ्याबरोबर सविस्तर चर्चा करायला हवी होती. माझ्याच मार्गदर्शनाखाली सोमदेवने अनेक महत्त्वपूर्ण विजय मिळविले आहेत. तो संघातील अन्य खेळाडूंनाही भडकावत आहे. युकी भांब्री, दिविज शरण व साकेत मिनेनी यांनी खेळातील राजकारणाकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या सरावावर लक्ष केंद्रित करावे. या खेळाडूंना अजून भरपूर टेनिस कारकीर्द करावयाची आहे.

Story img Loader