भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या एकेरीच्या
मुख्य फेरीत धडक मारली आहे. सोमदेवने पात्रता फेरीच्या तिसऱ्या सामन्यात
अमेरिकेच्या आठव्या मानांकित वेन ओडेस्निक याचा ६-३, ६-४ असा पराभव करून
मुख्य फेरीत स्थान मिळवले. सोमदेवला मुख्य फेरीतील सलामीच्या सामन्यात
स्पेनच्या डॅनियल मुनोझ-डे ल नावा याच्याशी लढत द्यावी लागेल. सोमदेवने याआधी
पात्रता फेरीच्या दोन्ही लढतींत सुरेख कामगिरीचे प्रदर्शन केले होते. त्याने पहिल्या
सामन्यात इटलीच्या मट्टेओ व्हिओला याचा ६-४, १-६, ६-४ असा पराभव केला होता.
त्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात फ्रान्सच्या क्वेन्टिन हलेस याच्यावर ७-६, ६-३ अशी
मात केली होती.

Story img Loader