Jasprit Bumrah on World Cup 2023: आशिया चषक २०२३च्या आधीचे १२ महिने जसप्रीत बुमराहसाठी खूप कठीण होते. २०२२च्या आशिया चषकादरम्यान त्याला दुखापत झाली आणि एक वर्ष तो क्रिकेटपासून दूर होता. या कालावधीत, तो २०२२चा टी२० विश्वचषक खेळला नाही किंवा २०२३ च्या आयपीएलमध्येही भाग घेतला नाही. त्याची अनुपस्थिती टीम इंडियाला स्पष्टपणे जाणवली. भारतीय संघाला ना २०२२ आशिया कप किंवा २०२२ टी२० वर्ल्ड कप जिंकता आला. बुमराहने आशिया चषक २०२३च्या आधी आयर्लंड दौऱ्यावर पुनरागमन केले आणि तेव्हापासून त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरी बहरत आहे. मैदानात परतल्यापासून बुमराहने मागे वळून पाहिलेच नाही. तो आणखीनच घातक गोलंदाज झाला. विरोधी संघांना पहिल्या १० षटकांत आणि शेवटच्या १० षटकांत बुमराहसमोर खेळणे कठीण जात आहे.

दुखापतीनंतर बुमराह आणखीनच जबरदस्त गोलंदाजी करत आहे

बुमराहने पुनरागमनाच्या तीन महिन्यांत आत्मविश्वास परत मिळवला आहे. तो सतत १४०+ च्या वेगाने चेंडू टाकत आहे. आता तो नेहमीपेक्षा जास्त भेदक गोलंदाजी करत आहे. पुनरागमनानंतर, बुमराहने एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या १३ डावांमध्ये २६ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या अनुपस्थितीत क्रिकेट चाहत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्याच्यावर मीम्स करत ट्रोल केले. मात्र, मैदानाबाहेर असताना बुमराहने एनसीएमध्ये खूप मेहनत घेतली. त्याच्या अनुपस्थितीबद्दल टीका हो असताना त्याने बाहेर काय सुरु आहे, याकडे दुर्लक्ष केले. आता त्याने भारतीय संघात पुनरागमन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य

हेही वाचा: Hardik Pandya Injury: टीम इंडियासाठी मोठी बातमी! हार्दिक पांड्याने नेटमध्ये सरावाला केली सुरुवात, कधी करणार संघात पुनरागमन?

बुमराह टीकाकारांना काय म्हणाला?

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना बुमराह म्हणाला, “माझी पत्नी [स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन] देखील स्पोर्ट्स मीडिया विभागात काम करते. तर होय, माझ्या कारकिर्दीवर बरेच प्रश्न उपस्थिती झालेले मी ऐकले आहेत. मी कधीही परत येणार नाही किंवा पुनरागमन करू शकणार नाही, असे लोक बोलत होते. मात्र, या सर्व गोष्टींचा माझ्यावर काही फरक पडला नाही. मी या क्षणी खूप आनंदी असून संघात परत आलो आहे. मला क्रिकेट खेळायला किती आवडते याची जाणीव सर्वांना झाली. मी कोणत्याही विक्रमाचा पाठलाग करत नव्हतो. दुखापतीतून पुनरागमन करताना माझ्याकडे खूप वेळ आणि आजूबाजूला चांगले वातावरण होते. मी सकारात्मक गोष्टींकडे पाहत असून  शक्य तितका त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहे.

वर्ल्ड कपमध्ये बुमराहची चमकदार कामगिरी

बुमराहने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत सहा सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या विजयातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आणि ३२ धावांत तीन विकेट्स घेतल्या. त्याच्या मदतीने भारताने २३० धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाला १२९ धावांत रोखले. इंग्लंडविरुद्धचा सामना भारतासाठी चांगलं आव्हान असल्याचं बुमराहने मान्य केलं. तसेच, धावांचे रक्षण करताना आपले मत मांडले.

हेही वाचा: Pakistan Cricket: पाकिस्तान क्रिकेटमध्ये नवं वादळ! विश्वचषकातील खराब कामगिरी अन् इंझमाम-उल-हकने दिला तडकाफडकी राजीनामा

इंग्लंडविरुद्धच्या सामन्याबाबत बुमराहचे वक्तव्य

जसप्रीत म्हणाला, “संघ दडपणाखाली होता, हे आमच्यासाठी चांगले आव्हान होते. आम्ही सुरुवातीला काही विकेट्स गमावल्या. आम्हाला मैदानावरही दडपण जाणवत होते आणि विजयासाठी खूप प्रयत्न करावे लागले. या निकालाने खूप आनंद झाला. हा निकाल आमच्यासाठी खरोखरच आत्मविश्वास वाढवणारा होता कारण, आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करत होतो. आम्ही काही काळापासून धावांचा पाठलाग करत सामना जिंकत आहोत. मी खेळलेल्या शेवटच्या मालिकेतही भारताने लक्ष्याचा पाठलाग केला होता. अशा स्थितीत धावांचा बचाव करताना बरे वाटले.”

तो पुढे म्हणाला, “सामान्यतः जेव्हा तुम्ही नवीन चेंडूने गोलंदाजी करता तेव्हा तुम्ही स्विंग पाहता. जिथे मदत नसते तिथे तुम्ही फक्त चांगली लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करा आणि शक्य तितक्या धावा कमी द्या. लखनऊमध्ये चेंडू थोडासा स्विंग होत होता, पण मी जास्त काही उघड करणार नाही. फक्त एवढेच सांगेन, मी चेंडूला शक्य तितका सीम करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे थोडी मदत होत होती. यानंतर मी सीम गोलंदाजीमध्ये बदल केला.”

Story img Loader