भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सौरव गांगुलीचा प्रवास संपणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष म्हणून दुसरी इनिंग खेळताना दिसणार नसल्याचे सौरव गांगुलीने मान्य केले आहे. सौरव गांगुली म्हणतो की, आता तो आणखी काही मोठ्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे. यासह माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी कोणत्याही विरोधाशिवाय बीसीसीआयचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. भारताचे माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली मागच्या तीन वर्षांपासून ही जबाबदारी पार पाडत आले आहेत.
बीसीसीआयच्या नव्या अध्यक्षाबाबत सुरु असलेल्या सर्व अटकळांवर स्वतः सौरव गांगुलीने मौन सोडले आहे. सौरव गांगुली सांगतो की, “प्रशासक म्हणून त्याने दीर्घ खेळी खेळली असून आता त्याचे लक्ष इतर काही कामांवर आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणाले की, मी बराच काळ प्रशासक आहे. पण आता मी माझ्या आयुष्यात पुढे जात आहे.”सौरव गांगुली पुढे म्हणाला की, “जेव्हा तो टीम इंडियासाठी १५ वर्षे खेळला तेव्हा तो त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. सौरव गांगुली म्हणाला, तुम्ही आयुष्यात काहीही करू शकता. पण माझ्यासाठी सर्वोत्तम काळ तो होता जेव्हा मी भारताकडून १५ वर्षे खेळलो. मी बीसीसीआयचा अध्यक्षही होतो. आता माझे लक्ष काहीतरी मोठे करण्यावर आहे.”
बीसीसीआयच्या जवळच्या सूत्रांनी पुष्टी केली आहे की भारताच्या माजी कर्णधाराला आयपीएल अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्याने ती नाकारली. गांगुली पुढे असे म्हणतो की, “मी बराच काळ अध्यक्ष होतो आणि आता मला काहीतरी नवीन करायचे आहे. मी आयुष्यात जे काही केले आहे, माझे सर्वोत्तम दिवस नक्कीच ते होते ज्यात मी सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. मी बीसीसीआयचे नेतृत्व केले आहे आणि यापुढेही मी महान गोष्टी करत राहीन. त्यावेळचे नियोजन आहे.”
हेही वाचा : T20 World Cup: ‘भारतीय संघ खूप भित्रा… नासिर हुसैन यांनी टीम इंडियाला डिवचले
गांगुली उदाहरण देत पुढे म्हणतो की,” इतिहासाची दखल घेणारा मी नाही. पूर्वी उच्च स्तरावर खेळण्यासाठी कौशल्याची कमतरता होती असा एक समज होता, परंतु हळूहळू गोष्टी बदलत आहेत. तुम्ही एका दिवसात अंबानी, सचिन तेंडूलकर किंवा नरेंद्र मोदी बनत नाही, त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत आणि कठोर समर्पण लागते.” रॉजर बिन्नी गांगुलीची जागा घेण्यासाठी तयार असले, तरी बीसीसीआच्या सचिवपदी मात्र जय शाह कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या काही दिवसात बीसीसीआयची नवीन कार्यकारिणी जाहीर केली जाऊ शकते.