‘सोनम गुप्ता बेवफा है’ असे लिहीलेल्या नोटांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून आता माजी क्रिकेटपटूंमध्येही या सोनम गुप्ताची चर्चा आहे. ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असा संदेश लिहीलेल्या जुन्या नोटा चर्चेत होत्या, पण गेल्या काही महिन्यांपासून नेटीझन्सच्या विस्मरणात गेलेली ही सोनम गुप्ता २ हजारांच्या नोटेमुळे पुन्हा एकदा प्रसिद्धीस आली. प्रियकराला दगा दिलेल्या सोनमचा प्रियकर अजूनही शांत बसला नाही हे पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारला. त्यामुळे ही सोनम गुप्ता नेमकी आहे तरी कोण? अशी शोधाशोध सोशल मीडियावर सुरू झाली.
वाचा: २ हजारांच्या नोटेवरही ‘बेवफा’ सोनम
सोनम गुप्ताच्या ‘बेवफा’ असण्याचा प्रश्न सर्वांना पडलेला असताना आकाश चोप्राने हाच प्रश्न घेऊन माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांची प्रतिक्रिया जाणून घेतली. आकाश चोप्रा याने माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार कपिल देव, व्ही.व्ही.एस लक्ष्मण, किरण मोरे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या व त्याचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हॅण्डलवर ट्विट केला आहे. आकाश चोप्रा या व्हिडिओमध्ये किरण मोरे, कपिल देव, व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांना सोनम गुप्ता बेवफा आहे की नाही? असा प्रश्न विचारताना दिसतो. आकाश चोप्राच्या या प्रश्नावर प्रत्येक जण आपापल्या स्टाईलने उत्तर देताना व्हिडिओमध्ये दिसतो. ‘बेवफा’ सोनम गुप्ताच्या व्हायरल प्रकरणावर या माजी क्रिकेटपटूंनीही विनोदांचा किस्सा सुरू केला आहे.
Sonam Gupta Bewafa Nahin Hai…that’s the verdict from the commentary box Three cheers to you, Sonam. pic.twitter.com/itM6txGj4v
— Aakash Chopra (@cricketaakash) November 20, 2016