Mi women vs up warriors women : महिला प्रीमियर लीगमध्ये एकाहून एक रंगतदार सामने होत आहेत. आज नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमध्ये या लीगचा १५ सामना खेळवण्यात आला. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स मैदानात आमने-सामने उतरले होते. यूपीन नाणेफेक जिंकून प्रथम फलंजदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यूपी वॉरियर्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करुन मुंबईचा आख्खा संघ १२७ धावांवर गारद केला. त्यामुळे यूपीला विजयासाठी १२८ धावांचं लक्ष्य गाठण्याचं आव्हान होतं. पण यूपीची खराब सुरुवात झाल्यानंतरही ताहिला मेक्ग्राने चौफेर फटकेबाजी केली. ताहिलाने २५ चेंडूत ३८ धावा कुटल्या. पण ताहिला बाद झाल्यानंतर यूपीची अष्टपैलू खेळाडू सोफी एक्लेस्टोनने शेवटच्या षटकात यूपीला ५ धावांची गरज असताना षटकार ठोकला. सोफीने षटकार ठोकून यूपी वॉरियर्सला विजयी सलामी दिली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा या लीगमध्ये पहिला पराभव झाला.
पण अमेलिया केरच्या गोलंदाजीवर ताहिला बाद झाल्याने यूपीला मोठा धक्का बसला. मात्र, कठीण परिस्थितीत ग्रेस हॅरिसने २८ चेंडूत ३९ धावांची खेळी साकारली. पण केरच्या गोलंदाजीवर हॅरिसचा झंझावात थांबला. मात्र, यूपीची अष्टपैलू खेळाडू सोफी एक्लेस्टोनने सावध खेळी करून यूपीला विजय मिळवून दिला.सोफीने १७ चेंडूत १६ धावांची नाबाद खेळी केली. दिप्ती शर्माने १४ चेंडूत १३ धावा केल्या.मुंबईसाठी कर्णधार हरमनप्रीत कौरने २२ चेंडूत २५ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज हिली मॅथ्यूजने ३० चेंडूत ३५ धावा कुटल्या.
मुंबईच्या इतर फलंदाजांना मोठी धावसंख्या करता आली नाही. यूपीच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबईच्या फलंदाजांना फलकावर मोठी धावसंख्या लावता आला नाही. वेगवान गोलंदाज अंजलीने यास्तिका भाटियाला बाद करून एक विकेट घेतला. तर राजेश्वरी गायकवाडने अमेलिया केर आणि हुमैरा काझीला बाद करून दोन विकेट्स मिळवल्या. सोफीने ३ तर दिप्ली शर्माला २ विकेट मिळाली.
यूपीची वेगवान गोलंदाज अंजली सरवानीने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून मुंबईची सलामीवीर फलंदाज यास्तिका भाटियाची दांडी गुल केली. यास्तिका १५ चेंडूत ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. दरम्यान, पॉवर प्लेमध्ये मुंबईची धावसंख्या ३१-१ झाली. सातव्या षटकानंतर मुंबई ३८-१ वर पोहोचली होती. पण आठव्या षटकात मुंबईला दुसरा धक्का बसला. यूपीची गोलंदाज सोफीने मुंबईच्या सिवरला ५ धावांवर पायचीत केलं. नवव्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या ४५-२ अशी झाली होती. दहाव्या षटाकत ११ धावांची वाढ झाल्याने मुंबई ५६-२ वर पोहोचली होती.
मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या मैदानात आमने-सामने उतरले होते. मुंबईने आतापर्यंत झालेल्या सर्व पाच सामन्यांमध्ये विजय मिळवून प्ले ऑफमध्ये प्रेवश केला आहे. ५ सामन्यांमध्ये १० गुण प्राप्त करून मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर यूपी वॉरियर्सने आतापर्यंत झालेल्या ५ सामन्यांपैकी २ सामन्यांवर विजय संपादन केल्याने गुणतालिकेत ते चौथ्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, आजच्या सामन्यात यूपीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांवर यूपीच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. यूपीची फिरकीपटू सोफी एल्केस्टोनने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. मुंबईच्या महत्वाच्या तीन फलंदाजांना बाद करून सोफीने मुंबईच्या धावसंख्येवर ब्रेक लावला.