दिल्ली कॅपिटल्स विरूध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात महिला प्रीमियर लीग २०२४ मधील अंतिम सामना खेळवला जात आहे. या सामन्यात आरसीबीची गोलंदाज सोफी मॉलिन्यू हिने बघता बघताच सामन्याचा रोख बदलला. सोफीने सामन्याच्या आठव्या षटकात दिल्लीच्या ३ मोठ्या विकेट्स घेतल्या. पहिल्याच चेंडूवर तिने ताबडतोड फलंदाजी करणाऱ्या शफालली वर्माला झेलबाद केले. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तिने नुकत्याच आलेल्या जेमिमाला क्लीन बोल्ड करत माघारी धाडले. तर पुढच्याच चौथ्या चेंडूवर तिने कॅप्सीला क्लीन बोल्ड करत गोल्डन डकवर बाद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या मोसमात पर्पल कॅपच्या शर्यतीतही नसणाऱ्या सोफी मॉलिन्यूने एकाच षटकात ३ विकेट्स घेत थेट पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तत्पूर्वी दिल्ली संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली संघाच्या सलामीवीर शफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग यांनी दिल्ली संघाला एक जबरदस्त सुरूवात करून दिली. आरसीबी संघाला पॉवरप्लेमध्ये अक्षरश: दिल्लीच्या धावांना रोखणं अवघड झालं होतं.

शफालीने दुसऱ्याच चेंडूपासून तुफानी फटकेबाजी केली. तिने बाद होण्यापूर्वी २७ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकार मारत ४४ धावा केल्या. शफाली आणि मेग लॅनिंगने पॉवरप्लेमध्ये सुरूवातीच्या ६ षटकात बिनबाद ६३ धावा केल्या. रेणुका सिंगच्या चौथ्या षटकात तर शफाली आणि लॅनिंगने मिळून १९ धावा केल्या. डिव्हाईनच्या पाचव्या षटकात त्यांनी ९ धावा केल्या. आरसीबीने सगळे गोलंदाज खेळवले पण यश काही आले नाही. आरसीबीने सगळे गोलंदाज खेळवले पण यश काही आले नाही. त्यानंतर आरसीबीची फिरकीपटू सोफी मॉलिन्यू पुन्हा आठवे षटक टाकण्यासाठी आली आणि दिल्लीने विकेट्स गमावण्यास सुरूवात केली. यानंतर दिल्लीच्या संघाला एकत्र ३ धक्के बसले आणि संघ चांगलाच कोडमडला. यानंतर दिल्लीच्या संघाला एकत्र ३ धक्के बसले आणि संघ चांगलाच कोडमडला. सामन्यातील आठवे षटक टाकण्यापूर्वी मॉलिन्यूने दुसरे षटक टाकले होते, त्या षटकात तिने १० धावा दिल्या.

सोफी मॉलिन्यूचे आठवे षटक
पहिला चेंडू – शफाली वर्मा वेयरमहकडून झेलबाद
दुसरा चेंडू – जेमिमा रॉड्रिग्ज – निर्धाव
तिसरा चेंडू – जेमिमा रॉड्रिग्ज खाते न उघडताच त्रिफळाचीत
चौथा चेंडू – कॅप्सी पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचीत
पाचवा चेंडू – मारिजन काप – निर्धाव
सहावा चेंडू – मारिजन काप – एक धाव

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sophie molineux took 3 wickets in a over watch video in dc vs rcb wpl 2024 final bdg