IND vs AUS, WTC 2023 Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत होता. पहिल्या दिवशीचा खेळ जेव्हा संपला होता, तेव्हा ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्स गमावत ३२७ धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी ट्रेविस हेड १४६ आणि स्मिथ ९५ धावांवर नाबाद राहिला होता. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला. परंतु, त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. याच कारणामुळं ऑस्ट्रेलियाने ३२७ धावा कुटल्या होत्या.
भारतीय संघांच्या खराब कामगिरीवर बोट दाखवत माजी कर्णधार सौरव गांगुलीने टीम इंडियाच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टी ब्रेकच्या वेळी गांगुलीने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं की, सुरुवातीलाच ऑस्ट्रेलिया संघांची दाणादाण उडाली होती. ऑस्ट्रेलियाने ७६ धावांवर ३ विकेट्स गमावले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने वापसी केली आणि फलकावर चांगली धावसंख्या उभारली. क्रिकेटमध्ये भागिदारी होते, हे मला माहित आहे.
एक फलंदाजी करणारा संघ असेल, जो वापसी करेल आणि चांगलं खेळेल. मला वाटलं की, लंचनंतर भारताने चांगली सुरुवात केली. परंतु, खेळ जसजसा पुढे गेला, संघाची रणनिती फोल ठरली. ट्रेविस हेडने सहजरित्या धावांचा पाऊस पाडला कारण भारताने त्याला धावा काढण्याची संधी दिली, असं मला वाटलं. तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे खेळपट्टीवर राहिल्यावर तो धावा काढणारच. टीम इंडियाच्या खेळाडूंनी सहजरित्या फलंदाजांना धावा काढून दिल्या.”