Sourav Ganguly 50th Birthday : भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुलीने काल (८ जुलै) आपला ५०वा वाढदिवस साजरा केला. आपल्या आयुष्यातील हा सुवर्णक्षण साजरा करण्यासाठी तो मित्रमंडळी आणि कुटुंबियासमवेत लंडनला गेलेला आहे. वाढदिवसाच्या रात्री बीसीसीआय अध्यक्ष असलेला सौरव गांगुली लंडनच्या रस्त्यावर मनसोक्त नाचताना दिसला. यावेळी त्याची मुलगी सना त्याच्यासाठी डीजे झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ अशी ओळख असलेला सौरव गांगुलीने आपल्या वाढदिवसाच्या रात्री ‘लंडन आय’ या प्रसिद्ध ठिकाणाजवळील रस्त्यावर भटकंती केली. यावेळी त्याच्यासोबत काही जवळचे मित्र आणि कुटुंबियदेखील होते. तिथे त्याने ‘ओम शांती ओम’ या हिंदी गाण्यावर मनोसक्त नृत्य केले. यावेळी त्याने आपली मुलगी सनालाही सोबत नाचण्यासाठी बोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सनाने आपण डीजे होतो असे म्हणून तिथून पळ काढला. आपल्या लाडक्या ‘दादा’ला असे मनोसोक्त नाचताना बघून चाहत्यांनी ट्विटरवर आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदरच सचिन तेंडुलकर, राजीव शुक्ला आणि जय शाह यांच्यासोबत गांगुली आपला वाढदिवस साजरा करताना दिसला होता. सचिन तेंडुलकरने तर पत्नी अंजली व मिस्टर-मिसेस गांगुलीसोबतचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly danced near london eye on 50th birthday celebration vkk