Sourav Ganguly on World Cup Scheduled: आयसीसीने मंगळवारी एकदिवसीय विश्वचषक २०२३चे वेळापत्रक जाहीर केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ५ ऑक्टोबरला गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यजमान भारत ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करेल. वेळापत्रक जाहीर झाल्यापासून अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी त्यावर मत व्यक्त केले आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही एक भावनिक संदेश लिहिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गांगुलीने ट्वीटरवर लिहिले, “भारतात विश्वचषक होण्याची वाट पाहत आहे. कोविडमुळे पुन्हा अध्यक्ष (BCCI) होण्यापासून वंचित राहिलो,” अशी खंत त्याने व्यक्त केली. पुढे तो म्हणाला की, “किती छान टूर्नामेंट आहे, विश्वचषकासाठी उत्तम ठिकाणे निवडले असून त्यांचे योग्य वाटप केले. कोणत्याही देशाला इतकी ठिकाणे असल्याचा अभिमान वाटेल. बीसीसीआय ही स्पर्धा जगासाठी अविस्मरणीय बनवेल. बीसीसीआय, जय शाह, रॉजर बिन्नी आणि इतर सर्व पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन. मला माहित आहे की हा एक जबरदस्त विश्वचषक असणार आहे. जर मी असतो तर वर्ल्डकपच्या वेळापत्रकाबाबत एवढे वाद होऊ दिलेच नसते.” यावरून त्याला अध्यक्ष पदासाठी पुन्हा निवड न झाल्यामुळे खंत वाटते आणि आता त्याला त्याच्या अध्यक्षपदाच्या काळात घडलेल्या घटनांची आठवण येत आहे. त्याने अप्रत्यक्षरित्या कौतुकाबरोबर टोमणा देखील मारला आहे.

आयपीएलमुळे WTC गमावली का? यावर गांगुलीने दिले उत्तर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल नेहमीच आयपीएलनंतर घेतली जाते. यावर्षी डब्ल्यूटीसी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर, खेळाडूंवरील कामाचा ताण लक्षात घेऊन बीसीसीआयने आयपीएल फ्रँचायझींशी बोलणे आवश्यक आहे. माजी कर्णधार पुढे म्हणाला, “मी या सिद्धांताशी सहमत नाही. अजिंक्य रहाणे देखील आयपीएल खेळला. तो आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल या दोन्हीमध्ये चांगली कामगिरी केली. म्हणूनच माझा या सिद्धांतावर विश्वास नाही. काही ऑस्ट्रेलियन खेळाडू (कॅमरॉन ग्रीन, डेव्हिड वॉर्नर) देखील आयपीएलमध्ये चांगली खेळले आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही अप्रतिम कामगिरी केली.”

हेही वाचा: Sourav Ganguly: रहाणेला उपकर्णधार बनवण्याच्या निर्णयावर गांगुलीचा संताप, म्हणाले, “जो थोडा चांगला खेळतो त्याला…”

गांगुली पुढे म्हणाला, “आयपीएल संपल्यानंतर कसोटी क्रिकेटशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ होता. रहाणे इंग्लंडला गेला आणि तो खेळला, हे पूर्वीही व्हायचे. तुम्ही एकदिवसीय क्रिकेट खेळलास आणि त्यानंतर तुला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे. त्यामुळे हा मुद्दा आहे असे मला वाटत नाही. माझा विश्वास आहे की तुम्ही जरी आयपीएल खेळलात तरी तुमच्यात परिस्थितीनुसार जुळवून घेण्याचे तंत्र आणि स्वभाव असणे गरजेचे आहे. कसोटी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता भारतीय संघात आहे फक्त सातत्य हवे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly expressed regret on not becoming bcci president for 2nd time and said controversies over wc schedule is not good avw