Ravichandran Ashwin Sets New Test Cricket Record : बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा शेवटचा चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी भारताला हा चौथा कसोटी सामना जिंकणे अनिवार्य आहे. दुसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी फिरकीपटू आर आश्विनने भेदक मारा करून ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. आश्विनने आजच्या डावात ६ विकेट घेतल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ ४८० धावांवर गारद झाला. त्यामुळे आश्विनवर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अशातच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीनं ट्वीटच्या माध्यमातून आश्विनवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीचे सुरुवातीचे तीन कसोटी सामने तीन दिवसांतच आटोपले. या सामन्यांमध्ये फिरकीपटूंच्या गोलंदाजीची कमाल पाहायला मिळाली. याआधीच्या सामन्यांमध्ये गोलंदाजांसाठी खेळपट्टी अनुकूल असल्याचं चित्र होतं. मात्र अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये सुरुवातीच्या दोन दिवसांत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धावांचा सूर गवसला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद ४८० धावा केल्या. यामध्ये उस्मान ख्वाजाने १८० तर कॅमरून ग्रीनने ११४ धावांची शतकी खेळी केली.

Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Gautam Gambhir Angry on Morne Morkel in Australia for turning up late at training IND vs AUS
Team India: गौतम गंभीर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मॉर्ने मॉर्कलवर संतापला, नेमकं काय घडलं होतं? प्रकरण आलं समोर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : ‘अनेकांचे पतंग कापले, पण माझा पतंग कुणीही कापलेला नाही’, छगन भुजबळांचं सूचक विधान
Hindi is not Indias national language R Ashwins controversial statement video viral
R Ashwin : ‘हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही…’, रविचंद्रन अश्विनच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, VIDEO होतोय व्हायरल
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Sam Konstas Admits Provoking Jasprit Bumrah in Sydney Test which Leads to Usman Khwaja Wicket Said My Fault
Bumrah Konstas Fight: “हो माझी चूक होती…”, बुमराहशी मुद्दाम वाद घातल्याचे कॉन्स्टासने केलं मान्य; म्हणाला, “माझ्यामुळे ख्वाजा…”

नक्की वाचा – RCB vs UPW : कर्णधार अ‍ॅलिसा हिलीने मैदान गाजवलं, यूपी वॉरियर्सचा १० गडी राखून RCB वर दणदणीत विजय

इथे पाहा ट्वीटर पोस्ट

दरम्यान, आश्विनने भारतीय संघाकडून या इनिंगमध्ये ४७.२ षटकांची गोलंदाजी करून ९१ धावा देत ६ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. त्यानंतर आश्विनच्या गोलंदाजीबद्दल बोलताना सौरव गांगुलीने ट्वीट करत म्हटलं, आश्विनला चांगल्या खेळपट्टीवर भेदक गोलंदाजी करताना पाहून छान वाटलं. क्लास नेहमीच दिसेल. हा एक चांगला कसोटी सामना होईल, अशी आशा आहे. अवघड खेळपट्टीवर खेळल्यानंतर भारतीय फलंदाजांसाठी या मालिकेत अशाप्रकारच्या खेळपट्टीवर चांगली फलंदाजी करण्याची संधी आहे.

आश्विन ठरला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

भारताकडून आश्विनने बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात कसोटी क्रिकेटमध्ये आश्विनच्या नावावर ११३ विकेट्सची नोंद झाली आहे. याआधी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेच्या नावावर होता. कुंबळेने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये १११ विकेट घेतल्या होत्या.

Story img Loader