वेगवेगळ्या भारतीय कर्णधारांविरोधात मी मैदानावर खेळलो असलो, तरी सौरव गांगुली हा माझा सर्वांत आवडता भारतीय कर्णधार असल्याचे कौतुकोदगार वेस्ट इंडिजचा प्रख्यात माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याने काढले. नेतृत्त्वकौशल्य या विषयावर ‘डेल’ने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात लारा याने आपले अनुभव मांडले.
सौरवचं माझा आवडता कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाचे त्याने केलेले नेतृत्त्व अतुलनीय होते. त्याच्या त्या कामगिरीबद्दल माझ्या मनात त्याच्याबद्दल कायमचं आदराचे स्थान असल्याचे लाराने सांगितले. कपिल देव आणि मित्रवर्य सचिन तेंडुलकर यांच्यातील नेतृत्त्वगुणांचेही त्याने यावेळी कौतुक केले.
तो म्हणाला, १९८३ मध्ये वेस्ट इंडिजचा क्रिकेटविश्वात दबदबा होता. त्यामुळे विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात पोहोचणे अतिशय सोपे असल्याचे मला वाटले. मात्र, या स्पर्धेत भारताने विजय मिळवल्याने मी आश्चर्यचकित झालो होतो. कपिल देव याने संघाचे नेतृत्त्व करताना विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते.
सचिन तेंडुलकरने क्रिकेटमध्ये जी कामगिरी करून ठेवलीये, त्याची पुनरावृत्ती होऊच शकणार नाही. त्याने भारतीय आणि जागतिक क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाचे मोजमाप करता येणार नसल्याचे लारा म्हणाला.

Story img Loader