भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) प्रशासकीय समितीमध्ये गांगुलीचा समावेश होण्याची चिन्हे आहेत.  या निमित्ताने गांगुलीच्या प्रशासकीय कारकीर्दीला प्रारंभ होणार असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी जगमोहन दालमिया यांची नियुक्ती झाल्यामुळे गांगुलीचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. गांगुली सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त सचिवपदावर विराजमान आहे.

Story img Loader