Sourav Ganguly to give online leadership training: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली आज वाढदिवस आहे. सौरव गांगुली आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी त्यांनी एक मोठी घोषणा केली. दादा आता ऑनलाइन नेतृत्व प्रशिक्षण देणार आहे. इन्स्टाग्रामवरील पोस्टच्या मदतीने त्यांनी ही माहिती दिली. मास्टरक्लास अॅपवर सौरव गांगुली नेतृत्वाबद्दल ज्ञान देणार आहे.

सौरव गांगुलीने टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढलं आणि नव्या उंचीवर नेलं. जेव्हा ‘प्रिन्स ऑफ कोलकाता’ला टीम इंडियाचे कर्णधारपद मिळाले, जेव्हा अनेक भारतीय क्रिकेटर्सवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले होते. त्यामुळे भारतीय क्रिकेटचे भविष्य अंधारात दिसत होते. दादाने संकटकाळात संघाचे कर्णधारपद तर सांभाळलेच पण कसे जिंकायचे हेही शिकवले.

Sourav Ganguly agrees with Gautam Gambhir opinion
Sourav Ganguly : ‘तो जे बोलला ते योग्यच…’, गौतम गंभीरने रिकी पॉन्टिंगला दिलेल्या प्रत्युत्तरावर सौरव गांगुलीचे वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
aditya roy kapoor
रुपेरी पडद्यावरील सच्चा प्रेमी आदित्य रॉय कपूर खऱ्या आयुष्यात पडला ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
aitraaz movie seqwel
अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा
Prithvi Shaw Dance Video Viral of his 25th Birthday Party Trolled for Disciplinary Issues in Ranji Trophy
Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा वाढदिवसाच्या पार्टीत ‘तांबडी चामडी’ गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर होतोय ट्रोल, VIDEO व्हायरल
dharmaveer producer mangesh desai writes special post for pravin tarde
“धर्मवीर २ केवळ तुझ्या संयमामुळे…”, प्रवीण तरडेंच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त मंगेश देसाईंची खास पोस्ट; म्हणाले…

गांगुलीने टीम इंडियाला अनेक दिग्गज खेळाडू दिले –

सौरव गांगुलीमुळे टीम इंडियाला वीरेंद्र सेहवागसारखा सलामीवीर, युवराज सिंगसारखा सिक्सर किंग आणि दोन विश्वचषक विजेता मिळाला. दादामुळे टीम इंडियाला हरभजन सिंग आणि झहीर खानसारखे दिग्गज गोलंदाज मिळाले. दादांनी आपल्या फलंदाजीच्या स्थानाचा त्याग केला नसता तर भारतीय क्रिकेटला महेंद्रसिंग धोनीसारखा यष्टिरक्षक फलंदाज क्वचितच मिळाला असता.

भावामुळे सौरव गांगुली डावखुरा फलंदाज बनला –

सौरव गांगुली क्रिकेटमध्ये दादा म्हणून प्रसिद्ध झाला आणि त्याच्या नेतृत्व क्षमतेमुळे तो भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनला. मात्र, गांगुलीसाठी क्रिकेटच्या मैदानात पोहोचणे इतके सोपे नव्हते. फुटबॉलसाठी प्रसिद्ध असलेल्या कोलकाता शहरात सौरवला त्याचा मोठा भाऊ स्नेहाशिषमुळे क्रिकेटचे व्यसन जडले आणि त्यामुळेच तो आपल्या भावाप्रमाणे डाव्या हाताने खेळू लागला, तर गांगुली लहानपणापासूनच उजव्या हाताने खेळणारा तो डाव्या हातने खेळू लागला. तो प्रत्येक काम उजव्या हाताने करायचा, पण त्याने त्याच्या भावासोबत सराव करण्यासाठी आणि त्याच्यासारखे खेळण्यासाठी खेळण्याची पद्धत बदलली.

हेही वाचा – Sourav Ganguly Birthday: सौरव गांगुलीचा ‘महाराजा’ ते ‘दादा’ पर्यंतचा जीवनप्रवास, जाणून घ्या भावामुळे कसे बदलले नशीब?

सौरव गांगुलीची कारकीर्द –

सौरव गांगुलीने ४२४ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि ४८८ डावांमध्ये ४१.४६च्या सरासरीने १८,५७५ धावा केल्या. त्याने एकूण ३८ शतके आणि १०७ अर्धशतके झळकावली, ज्यामध्ये २३९ त्याची सर्वोत्कृष्ट धावसंख्या आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा १५वा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा गांगुली चौथ्या क्रमांकावर आहे.