भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता राजकारणात प्रवेश करण्याची चिन्हे आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यासाठी भारतीय जनता पक्षाने गांगुलीला तिकीट देण्याचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला आहे. मात्र गांगुलीने अद्याप हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीच गांगुलीसमोर हा प्रस्ताव ठेवला आहे. जर लोकसभेत भाजपने बाजी मारली तर क्रीडामंत्री म्हणून गांगुलीला निवडण्यात येईल, असे आश्वासन त्याला देण्यात आल्याचे समजते. ‘‘माझ्यासमोर भाजपचा प्रस्ताव आहे. पण गेल्या काही दिवसांत मी अन्य कामांत व्यग्र असल्यामुळे मला त्यावर विचार करता आलेला नाही. मी लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहे,’’ असे गांगुलीने सांगितले. नोव्हेंबर महिन्यात गांगुलीने आपल्या एका मित्राच्या मदतीने भाजपचे राष्ट्रीय महासचिव वरुण गांधी यांची भेट घेतल्यानंतरच गांगुलीच्या राजकारणातील प्रवेशाबाबतच्या चर्चाना उधाण आले होते.

Story img Loader