सौरव गांगुलीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष म्हणून गेल्या काही महिन्यांत खूप टीकेला सामोरे जावे लागले. त्याच्या कार्यकाळात महिला क्रिकेटसाठी फार योजना अमलात आणल्या नसल्याचा आरोपही झाला. शिवाय, विराट कोहली आणि गांगुली यांच्यातील दुफळीही समोर आली. आता तो निवड समितीच्या बैठकांना उपस्थित राहत असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आता गांगुलीने यासंदर्भात मत दिले आहे.

गांगुलीने निवड समितीच्या बैठकांमध्ये सहभागी होण्याचा आरोप फेटाळून लावला आहे. गांगुली पीटीआयशी संभाषणात म्हणाला, “मला यावर उत्तर देण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. यापैकी कोणत्याही निराधार आरोपांना महत्त्व दिले नाही पाहिजे. मी बीसीसीआयचा अध्यक्ष आहे आणि बीसीसीआयच्या अध्यक्षांनी जे करावे ते मी करतो.”

yugendra pawar slams ajit pawar ncp for not opposing gopichand paradkar over his remarks on sharad pawar
पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता;  युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta readers response
लोकमानस : अदानी देशापेक्षा मोठे आहेत का?
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
george soros loksatta editorial
अग्रलेख : ‘परदेशी हाता’चे भूत!
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन

२०१९मध्ये एका ट्वीटमध्ये, बीसीसीआयने बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी निवड समितीच्या बैठकीचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये गांगुली आणि बीसीसीआय सचिव जय शाह दिसून आले होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर गांगुली म्हणाला, ”मी हे स्पष्ट करू इच्छितो की हा फोटो (ज्यामध्ये गांगुली, जय शाह, कर्णधार विराट कोहली आणि जॉइंट सेक्रेटरी जयेश जॉर्ज बसलेले आहेत) निवड समितीच्या बैठकीचा नव्हता. जयेश जॉर्ज निवड समितीचा भाग नाही.”

हेही वाचा – अखेर ‘तो’ विक्रम तुटला..! ‘बेबी एबी’चा मोठा पराक्रम; भारताच्या ‘गब्बर’ला टाकलं मागे!

गांगुलीने बीसीसीआयमध्ये गेल्या २६ महिन्यांतील जय शाहसोबतच्या संबंधांवर आपले मत मांडले आहे. गांगुली म्हणाला, “माझे जयसोबत चांगले नाते आहे. तो एक चांगला मित्र आणि विश्वासू सहकारी आहे. मी, जय, अरुण (धुमाळ) आणि जयेश (जॉर्ज) आम्ही या दोन वर्षांत बोर्डाला पुढे नेण्यासाठी एकत्र काम करत आहोत, विशेषत: कोविड-१९ च्या कठीण काळात. मी म्हणेन की ही दोन वर्षे खूप छान होती. आम्ही एक संघ म्हणून हे केले आहे.”

Story img Loader