भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपल्या वाढदिवशी दिलेल्या मुलाखतीत मुख्यत्वे महेंद्रसिंग धोनीची स्तुती केली व आतापर्यंतचा सर्वोत्तम ‘ऑल टाईम ग्रेट’ भारतीय संघ निवडला गेला तर, त्या संघाच्या कर्णधारपदासाठी महेंद्रसिंग धोनीची मी निवड करेन असेही म्हटले. सोमवारी गांगुलीने ४१व्या वर्षांत पदार्पण केले. वडिलांच्या निधनामुळे सौरवने हा वाढदिवस साजरा केला नाही, मात्र वाढदिवसानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. सौरव म्हणाला, धोनीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. भारताच्या ‘ऑल टाईम ग्रेट’ अकरा खेळाडूंच्या संघाचे कर्णधारपदासाठी धोनीच योग्य आहे. कारण, त्याच्याकडे उत्तम फलंदाजी आणि यष्टीरक्षणाची क्षमता आहे. धोनीसारखा तडफदार फलंदाजी करणारा यष्टीरक्षक मी आतापर्यंत पाहीलेला नाही.
तसेच मी माझी पसंती सांगत असल्याने मी स्वत:ला या अकरा खेळाडूंमध्ये पाहत नाही असेही सौरव स्वत:च्या निवडीबाबत आपले विधान स्पष्ट केले.
स्वत:ची धोनीबरोबर तुलना करण्यावर दुर्लक्ष करत सौरव म्हणाला, मी तुलना करण्यावर विश्वास ठेवत नाही. खेळात खेळाडूंची तुलना करणे शक्य नसल्याचे सौरवने म्हटले 

Story img Loader