Sourav Ganguly says Rishabh Pant to become All Time Great in Test Cricket : बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे पुनरागमन झाले. २०२२ नंतर ऋषभ पंत कसोटी संघाचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऋषभ पंतच्या संघात पुनरागमन करण्याबाबत माजी कर्णधार सौरव गांगुलीने मोठे वक्तव्य केले आहे. गांगुलीने पंतचे सर्वोत्कृष्ट भारतीय कसोटी फलंदाज म्हणून वर्णन केले आणि सांगितले की तो आतापर्यंतचा महान खेळाडू होण्याच्या मार्गावर आहे. पंतच्या पुनरागमनामुळे मला आश्चर्य वाटत नसल्याचेही गांगुलीने सांगितले.

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली असे मानतो की ऋषभ पंत कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडू होण्याच्या मार्गावर आहे, परंतु त्याच वेळी त्याला छोट्या फॉरमॅटमध्ये आपली कामगिरी सुधारण्याची गरज आहे. डिसेंबर २०२२ मध्ये कार अपघातात जखमी झाल्यानंतर पंतचा रविवारी प्रथमच भारतीय कसोटी संघात समावेश करण्यात आला. त्यामुळे १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हमनमध्ये स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. हा सामना चेन्नईत खेळला जाणार आहे.

Mark Wood out for the year with an elbow injury
ENG vs SL : इंग्लंड संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज मार्क वुड यंदा क्रिकेट खेळणार नाही; नेमकं काय आहे कारण?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Mohammed Shami on Rohit Sharma and Rahul Dravid
‘मी कोणत्याच विश्वचषकात पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हतो…’, मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, मला संघातून…
Harbhajan Singh Statement on Rohit Sharma MS Dhoni
Harbhajan Singh: “धोनी खेळाडूंशी बोलत नाही, तर रोहित…” भारतीय कर्णधारांवर हरभजन सिंगचे वक्तव्य, सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून ‘या’ खेळाडूला पसंती
Joe Root break Steve Waugh record and now 2nd player who scored most Runs in winning Matches
Joe Root : जो रुटने सहा दिग्गजांना मागे टाकत केला मोठा पराक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसराच खेळाडू
Rahul Dravid son Samit Dravid India U19 call up
Samit Dravid : राहुल द्रविडचा मुलगा समित भारताच्या १९ वर्षाखालील संघात निवड होऊनही विश्वचषकात का खेळू शकणार नाही? जाणून घ्या
Barinder Sran Announces International Retirement
Barinder Sran: धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजाने घेतली निवृत्ती, पहिल्याच्य टी-२० सामन्यात घेतले होते ४ विकेट्स
ENG vs SL 1st Test Who is Harry Singh Son of India Former Player RP Singh Senior in England Test Team
ENG vs SL: इंग्लंडच्या कसोटी संघात भारताच्या माजी खेळाडूचा लेक, अचानक कशी मिळाली संधी?

ऋषभ पंत भारतातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक –

ऋषभ पंतने या वर्षाच्या सुरुवातीला मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले होते आणि त्यात चांगली कामगिरी केली होती. एका कार्यक्रमादरम्यान सौरव गांगुली म्हणाला, ‘मी ऋषभ पंतला भारतातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक मानतो. त्यामुळे ऋषभच्या कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनामुळे मला आश्चर्य वाटत नाही. तो भारताकडून कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे.’

हेही वाचा – सुवर्णयशाचे ध्येय! बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील भारताच्या मोहिमेस आजपासून प्रारंभ

ऋषभ पंतचा कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये समावेश होईल –

सौरव गांगुली पुढे म्हणाला, ‘तो अशीच कामगिरी करत राहिल्यास कसोटी क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होईल. मला विश्वास आहे की त्याला छोट्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. तो प्रतिभावान आहे आणि मला खात्री आहे की तो लवकरच असे करण्यात यशस्वी होईल.’

ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे टीम इंडिया मजबूत –

ऋषभ पंतचे कसोटी संघात पुनरागमन झाल्याने भारतीय संघ अधिक मजबूत झाला आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याची अष्टपैलू कामगिरी. ऋषभ पंत जेवढा मोठे फटके मारण्यात पटाईत आहे, तेवढाच तो यष्टिरक्षणातही यशस्वी ठरला आहे. २०१८ मध्ये कसोटी पदार्पण केल्यापासून ऋषभ पंतच्या कामगिरीत सातत्याने सुधारणा होत आहे. त्याने त्याच्या किपिंग आणि बॅटिंग स्किल्सवर खूप काम केले आहे, जे मैदानावरही दिसून येते.

हेही वाचा – ENG vs SL: पाथुम निसांका शतक झळकावताच ठरला नंबर वन फलंदाज, इंग्लंडविरूद्ध सामन्यात विक्रमांचा पाऊस

भारताने घरच्या मैदानावर कांगारूंना २-१ ने पराभूत केले तेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२०-२१ च्या परदेशातील कसोटी मालिकेत पंत हा टीम इंडियाचा सर्वात मोठा मॅच विनर होता. गाबा येथे झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात, पंतने ८९ धावांची नाबाद खेळी करत भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.