“महेंद्रसिंह धोनीसाठी सौरव गांगुलीने संघात आपली जागा सोडून फलंदाजीसाठी धोनीला बढती दिली, ‘दादा’ने दाखवलेल्या या औदार्यामुळेच महेंद्रसिंह धोनी आज चांगला फलंदाज होऊ शकला आहे.” इंडिया टुडे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने हे वक्तव्य केलं आहे. जर गांगुलीने धोनीला फलंदाजीत बढती दिली नसती तर आज महेंद्रसिंह धोनी कदाचीत या तोडीचा फलंदाज बनला नसता, असंही सेहवाग म्हणाला.

अवश्य वाचा – पहिल्या टी-२० सामन्यात ‘या’ ९ विक्रमांची नोंद

“मी संघात असताना आम्ही फलंदाजीत काही नवीन प्रयोग करत होतो. जर सलामीच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर सौरव गांगुलीने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी कऱण्याचं ठरवलं होतं. मात्र सलामीवीर चांगली सुरुवात करुन देण्यात अयशस्वी झाले तर इरफान पठाण किंवा महेंद्रसिंह धोनी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार असं ठरलं होतं.” ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सेहवाग बोलत होता.

अवश्य वाचा – Video: कोहलीचा ‘बुलेट थ्रो’ आणि धोनीही काही क्षणांसाठी भांबावला

तरुण खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याकडे सौरव गांगुलीचा कल होता. त्यामुळे धोनीला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्याचा निर्णय गांगुलीने घेतला, धोनीची कामगिरी सुधारण्यासाठी सौरवने घेतलेला हा निर्णय त्याच्यासाठी महत्वाचा ठरल्याचंही सेहवागने नमूद केलं. फार कमी कर्णधार स्वतःची जागा इतर खेळाडूंना बढती देतात, मात्र काळाची पावलं ओळखून गांगुलीने तो निर्णय घेत धोनीला बढती देण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader