Sourav Ganguly’s reaction to Pakistan Team: एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तानचा हा आठवा पराभव ठरला. या पराभवानंतर पाकिस्तान संघावर बरीच टीका होत आहे. बाबर आझमच्या कर्णधारपदावर आणि संघावर त्याच्याच देशाचे अनेक माजी खेळाडू प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पाकिस्तान संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वास्तविक, सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या मोठ्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाला भारताविरुद्ध ७ विकेट्सनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात पाकिस्तान अजिबात दबाव सहन करू शकला नाही आणि हेच त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले, ज्याबद्दल सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्या काळात पाकिस्तान वेगळा संघ होता –

सौरव गांगुली म्हणाला की, त्यांच्या काळात पाकिस्तानचा असा कोणताही संघ नव्हता, ते बरोबरीची टक्कर द्यायचे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) माजी अध्यक्षांनी असेही म्हटले की भारताविरुद्धच्या दणदणीत पराभवामुळे कदाचित त्याचा आत्मविश्वास ढासळला असेल. या अनुभवी क्रिकेटपटूने पुढे सांगितले की, जर पाकिस्तान क्रिकेट संघाच्या फलंदाजीत सुधारणा झाली नाही, तर २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत पुनरागमन करणे त्यांच्यासाठी खूप कठीण जाईल.

हेही वाचा – IND vs BAN: सराव सत्रात पावसाची हजेरी, सामन्यात ठरणार का अडथळा? जाणून घ्या हवामान आणि खेळपट्टीचा अहवाल

टाईम्स नाऊच्या माहितीनुसार सौरव गांगुली म्हणाले की, “आमच्या काळात पाकिस्तान हा वेगळा संघ होता, आम्ही ज्या पाकिस्तान संघाविरुद्ध खेळायचो तसा हा संघ नाही. हा संघ फलंदाजी करताना दडपण सहन करू शकत नाही. पाकिस्तानने अशीच फलंदाजी सुरू ठेवली, तर त्यांना या विश्वचषकात पुनरागमन करणे कठीण होईल.”

सौरव गांगुलीने केले टीम इंडियाचे कौतुक –

दरम्यान, सौरव गांगुलीने विश्वचषक २०२३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचे कौतुक केले, जे सध्या सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहे. माजी भारतीय कर्णधार म्हणाला, “रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध चमकदार कामगिरी केली. भारतातील प्रत्येक विभाग उत्तम कामगिरी करत आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागाने योग्य वेळी उत्तम कामगिरी केली.”