Virat Kohli will be India’s key player for Asia Cup and World Cup along with Rohit Sharma: माजी कर्णधार सौरव गांगुलीने आशिया चषक आणि बहुप्रतिक्षित २०२३ विश्वचषकापूर्वी विराट आणि रोहितच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे. टीम इंडिया आशिया चषक २०२३ मध्ये २ सप्टेंबर रोजी कँडीच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
दरम्यान, आशिया चषकातील त्यांच्या मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी, गांगुलीने टीम इंडियाच्या सेटअपबद्दल आपले विचार मांडले. तो म्हणाला, आशिया कप आणि आयसीसी स्पर्धेसाठी कर्णधार रोहितसह कोहली टीम इंडियाचे आवडते खेळाडू असतील.
विराट आणि रोहितवर बरेच काही अवलंबून असेल –
रेव्ह स्पोर्टशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, “विराट कोहली खूप चांगला खेळत आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. आगामी स्पर्धेत रोहित शर्मासह तो भारताची ताकद आणि संघातील महत्त्वाचा खेळाडू असेल. रोहितचा फॉर्मही तितकाच महत्त्वाचा असेल. गेल्या विश्वचषकात (२०१९) त्याने पाच शतके झळकावली होती आणि आगामी विश्वचषकातही तो याच कामगिरीची पुनरावृत्ती करू इच्छितो.”
तो पुढे म्हणाला, “कदाचित कर्णधार म्हणून हा त्याचा पहिला आणि शेवटचा विश्वचषक असेल. जरी तो अजूनही टी-२० विश्वचषकात हे करू शकतो, पण एकदिवसीय विश्वचषकासाठी अजून चार वर्षे आहेत. मला वाटत नाही की तो इतका वेळ खेळू शकेल. या विश्वचषकात प्रत्येकजण महत्त्वाचा असेल आणि मला आशा आहे की ते उभे राहून कामगिरी करतील.”
आशिया कप (वनडे फॉरमॅट) मध्ये सक्रिय खेळाडूंमध्ये टीम इंडियासाठी रोहित आणि कोहली सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत. या यादीत रोहितने २२ सामन्यात ७४५ धावा केल्या आहेत, तर कोहलीने केवळ ११ सामन्यात ६१३ धावा केल्या आहेत. कोहली वनडेत १३ हजार धावांचा टप्पा ओलांडण्यास अवघ्या १०२ धावांनी दूर आहे. आशिया चषक २०२३ मध्ये तो ही कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.