आशिया चषकाला आजपासून सुरूवात सुरवात होत आहे. भारत आपला पहिला सामना २८ ऑगस्टरोजी पाकिस्तान विरूद्ध खेळणार आहे. यावेळी सर्वांचे लक्ष विराट कोहलीच्या फॉर्मकडे असेल. दरम्यान, या सामन्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं विराट कोहलीच्या फार्मबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ”मला कोहलीला जुन्या अवतारात बघायचं आहे”, असं गांगुलीने म्हटलं आहे. तसेच या स्पर्धेत विराट चांगले प्रदर्शन करेन, असा विश्वासही गांगुलीने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Asia Cup 2022 : शाहीन आफ्रिदीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का, ‘हा’ वेगवान गोलंदाज स्पर्धेतून बाहेर

“कोहलीला भारतासाठीच नव्हे, तर स्वत:साठीदेखील रन्स काढावे लागणार आहे. आम्हाला विश्वास आहे की, या स्पर्धेत कोहलीचा फॉर्म नक्कीच परत येईल, तो या स्पर्धेत चांगले रन्स काढेल. विराट मोठा खेळाडू आहे. त्याची खेळायची एक पद्धत आहे. क्रिकेटमध्ये कोणताही खेळाडू सतत रन्स काढू शकत नाही. प्रत्येक खेळाडूच्या करियरमध्ये वाईट काळ येतो”, अशी प्रतिक्रिया सौरव गांगुलीने दिली आहे.

हेही वाचा – Asia Cup 2022 : आजपासून आशिया चषकाला सुरूवात; जाणून घ्या भारतात कुठे आणि किती वाजता बघता येतील सामने

उद्या ( २८ ऑगस्टरोजी ) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर भारत-पाकिस्तान हा हायव्होलटेज सामना खेळवला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघांकडून कसून सराव सुरू आहे. भारतील संघ आपला पहिला सामना जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरेल. गेल्या अनेक दिवसांपासून खराब कामगिरीमुळे विराट कोहलीवर सातत्याने टीका होते आहे. या स्पर्धेत आपल्या उत्तम कामगिरीत करत आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्याचा कोहलीचा प्रयत्न असेल.

Story img Loader