India vs Australia, WTC 2023 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांनी पराभव झाला. लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळवण्यात आलेला हा सामना जिंकण्यासाठी भारताला ४४४ धावांची गरज होती, पण पाचव्या दिवशी उपाहारापूर्वी त्याचा संपूर्ण संघ २३४ धावांवर बाद झाला. या पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी विजेतेपदाचे स्वप्न पुन्हा भंगले. भारताने २०१३ मध्ये शेवटचे ICC विजेतेपद पटकावले होते.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि BCCI बॉस सौरव गांगुली यांनी अलीकडेच सांगितले की विराट कोहलीने २०२२मध्ये स्वेच्छेने कसोटी कर्णधारपद सोडले कारण त्याने रोहित शर्माला सर्व फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पाठिंबा दिला होता. कोहलीने जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कर्णधारपद सोडले होते. अशा परिस्थितीत रोहित शर्माला फेब्रुवारी २०२२ पासून सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद मिळाले, पण आता गांगुलीने खुलासा केला आहे की, “बीसीसीआय विराटला कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी कुठलाही दबाव टाकला नव्हता, त्याने तो निर्णय स्वच्छेने घेतला होता.”

IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
KL Rahul Statement on Sanjiv Goenka Animated Chat in IPL 2024 loss Said Wasn’t the nicest thing Ahead
KL Rahul: “मैदानावर जे काही घडलं ते फार चांगलं…”, संजीव गोयंका भर मैदानात भडकल्याच्या घटनेवर केएल राहुलने पहिल्यांदाच केलं वक्तव्य
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

WTC पराभवानंतर टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आज तकला विशेष मुलाखत दिली. या काळात गांगुलीने विराट कोहलीसोबतच्या कर्णधारपदाच्या वादावरही चर्चा केली. दक्षिण आफ्रिका मालिका संपल्यानंतर विराट कोहलीने स्वतः कसोटी कर्णधारपद सोडले होते, असे गांगुलीने सांगितले. गांगुलीने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचेही कौतुक केले.

हेही वाचा: Gautam Gambhir: “केवळ पैसा, प्रसिद्धी हे उद्दिष्ट ठेवून…”, दिग्गज क्रिकेटपटूंनी केलेल्या पान मसाल्याच्या जाहिरातीवर गौतमची ‘गंभीर’ टीका

गांगुली म्हणाला, “आता बोलून काही फायदा नाही. विराटने कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार नव्हतो. हा त्याचा निर्णय होता. त्यावेळी कुणाला तरी कर्णधार बनवायचे होते. त्यावेळी रोहित शर्मा हा सर्वोत्तम पर्याय होता. माझा रोहितवर खूप विश्वास आहे. पाच वेळा आयपीएल जिंकणे ही मोठी गोष्ट आहे. विश्वचषक जिंकण्यापेक्षा आयपीएल जिंकणे कठीण आहे. तुम्हाला १४ सामने खेळायचे आहेत, त्यानंतर आयपीएलमध्ये प्लेऑफ आहे. मला विश्वास आहे की कर्णधार म्हणून रोहित हा अजूनही सर्वोत्तम पर्याय आहे.”

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यातील पराभवाबद्दल असे सांगितले

डब्ल्यूटीसी फायनलमधील पराभवाबद्दल गांगुली म्हणाला, “मला असा विश्वास आहे की रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड किमान २०२३च्या विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व करतील, जे भारत ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित करेल.” गांगुली पुढे म्हणाला, “नक्कीच, तो (रोहित कर्णधार आणि राहुल प्रशिक्षक) किमान विश्वचषकापर्यंत कायम राहील. बरं, विश्वचषकानंतर रोहितच्या मनात काय आहे आणि त्याला काय करायचे आहे हे मला माहीत नाही. प्रशिक्षक आणि आमच्यासाठी कर्णधार हे दोघे सर्वोत्कृष्ट आहेत आणि मी त्यांना शुभेच्छा देतो.”

हेही वाचा: India Tour of WI: भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा जाहीर! युवा खेळाडूंना आजमावण्याची संधी, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

गांगुली-कोहली यांच्यात काय वाद होता?

२०२१ च्या टी२० विश्वचषकापूर्वी, विराट कोहलीने जाहीर केले की तो स्पर्धेनंतर बहुतेक फॉरमॅटचे कर्णधारपद सोडणार आहे. तेव्हा कोहलीने स्पष्टपणे सांगितले होते की, “त्याला कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद पुढे चालू ठेवायचे आहे, परंतु बीसीसीआयला वन डे आणि टी२० फॉरमॅटमध्ये वेगळे कर्णधार हवे होते. अशा स्थितीत विराट कोहलीकडून वन डे संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले.

त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या सुरुवातीपासूनच विराट कोहलीने पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा केला. कोहली म्हणाला होता, “जेव्हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ निवडला जात होता, तेव्हा मला बैठकीला बोलावण्यात आले होते. कसोटी संघाबाबत निवडकर्त्यांशी चर्चा करण्यात आली, मात्र बैठकीअंती मला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मी निवडकर्त्यांचा निर्णय मान्य केला.”