Sourav Ganguly Adviced BCCI For Selecting New Coach: टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपद रिक्त होणार आहे. भारतीय संघ सध्या अमेरिकेत असून टी-२० विश्वचषकाची तयारी करत आहे. या टी-२० विश्वचषकादरम्यान राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. त्यानंतरच त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी बीसीसीआयने अर्जही मागवले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे होती. त्यामुळे कधीही भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा करण्यात येईल. पण तत्त्पूर्वी गांगुलीने ट्विट करत बीसीसीआयला सावध केलं आहे.

गौतम गंभीर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी प्रबळ दावेदार आहे. गेल्या काही दिवसांपासून समोर आलेल्या रिपोर्टमध्येही असं म्हटलं आहे की गौतम गंभीरच भारताचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे, फक्त अधिकृत घोषणा करणं बाकी आहे. यावरून गांगुलीचे हे ट्वीट गौतम गंभीरला मुख्य प्रशिक्षक करणार याच्याशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.

Sourav Ganguly agrees with Gautam Gambhir opinion
Sourav Ganguly : ‘तो जे बोलला ते योग्यच…’, गौतम गंभीरने रिकी पॉन्टिंगला दिलेल्या प्रत्युत्तरावर सौरव गांगुलीचे वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Raosaheb Danve Viral Video:
Raosaheb Danve : कार्यकर्त्याला लाथ मारल्याच्या व्हिडीओवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रया; म्हणाले, “माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो, तेव्हा…”
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Sule indirectly attacked Ajit Pawar and his supporters during speech
“आजकाल भाषण करतांना काळजी घ्यावी लागते” सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
Gautam Gambhir Backs KL Rahul With Big Statement Said How Many Teams Have a Player Like Him Border Gavaskar Trophy
Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

हेही वाचा – T20 WC 2024: “मी संघाचा कर्णधार आहे…”, रोहित शर्मा सर्वांसमोर कुलदीपला पाहा काय म्हणाला; VIDEO व्हायरल

सौरव गांगुलीच्या ट्विटने खळबळ

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज X वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये भारतीय प्रशिक्षकाला सल्ला देण्यात आला आहे. सौरवने लिहिले आहे की, “कोणाच्याही जीवनात प्रशिक्षकाला खूप महत्त्व असतं. प्रशिक्षकाचे मार्गदर्शन आणि निरंतर प्रशिक्षण हे कुणाच्याही जीवनाला आकार देणारं असतं. मग ते मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर. त्यामुळे प्रशिक्षकाची निवड समजूतदारपणे केली पाहिजे,” असं गांगुलीचं म्हणणं आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द

गांगुलीच्या या ट्विटवरून ते भारतीय संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाचा संदर्भ देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ट्विटचा संबंध गौतम गंभीरशीही जोडले जात असल्याची चर्चा आहे. सौरव गांगुलीच्या या ट्विटवर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि गौतम गंभीर यांची भेट झाली, त्यानंतर त्याच्या नावाची चर्चा जोरात सुरू झाली.

अहवालानुसार, या पदासाठी विदेशातील अनेक दिग्गजांशी चर्चा केल्याची बातमी समोर आली होती. ज्यामध्ये रिकी पाॅंटिग, जस्टिन लँगर, स्टीफन फ्लेमिंग या नावांचा समावेश होता. तर बोर्डाचे सचिव जय शाह यांनी आधीच सांगितले आहे की ते भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत रचनेची चांगली माहिती असलेल्या उमेदवाराच्या शोधात आहेत. बीसीसीआयचे लक्ष राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर होते परंतु हैदराबादचे माजी क्रिकेटपटू पूर्णवेळ पदासाठी इच्छुक नसल्याचे काही रिपोर्टमध्ये दिसून आलं.