Sourav Ganguly Daughter Sana Ganguly Accident : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची मुलगी सना गांगुली हिच्या कारला कोलकात्यातील डायमंड हार्बर रस्त्यावर एका बसने धडक दिल्याची घटना घडली आहे. मात्र, यामध्ये सनाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. डायमंड हार्बर रस्त्यावरील बेहाला चौरस्ता परिसरात बसने सना गांगुलीच्या कारला धडक दिली. यावेळी सना गांगुली ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बस चालकाला पाठलाग करून पकडले

या अपघातानंतर बस चालकाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण सना गांगुलीच्या कारच्या चालकाने त्याचा पाठलाग करत साखर बाजारजवळ त्याला गाठले. यानंतर सना गांगुलीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बस ड्रायव्हरला अटक केली. शुक्रवारी संध्याकाळी घडलेल्या अपघाताच्या ठिकाणापासून सौरव गांगुलीचे घर अवघ्या दोनशे मीटर अंतरावर आहे.

हे ही वाचा : Rohit Sharma: “मी दोन मुलांचा बाप आहे, मला कळतं…”, रोहित शर्मा निवृत्तीच्या चर्चांबद्दल बोलताना वैतागला; नेमकं काय म्हणाला?

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?

अपघातावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले की, कोलकात्याहून रायचककडे जाणारी बस अचानक सना गांगुलीच्या कारला धडकल्याने हा अपघात झाला. सना गांगुली या अपघातातून थोडक्यात बचावली कारण, ती कारमध्ये चालकाच्या शेजारच्या सीटवर बसली होती. दरम्यान गांगुली कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळाल्यानंतर, कोलकाता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी आरोपी बस चालकाला अटक केली.

हे ही वाचा : BBL 2025 : मैदानातच भीषण अपघात! कॅच घेण्याच्या नादात दोन खेळाडूंमध्ये जोरदार धडक, एकाच फुटलं नाक, VIDEO व्हायरल

कोण आहे सना गांगुली?

२००१ मध्ये जन्मलेल्या सना गांगुलीने कोलकाता येथील लोरेटो हाऊस स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर, तिने प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये असताना, सनाने विविध इंटर्नशिप करत वैविध्यपूर्ण कौशल्य विकसित केले. या दरम्यान सनाने HSBC, KPMG, Goldman Sachs, Barclays आणि ICICI सारख्या प्रतिष्ठीत कंपन्यांसोबतही काम केले आहे. सनाच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसा ती सध्या लंडनमध्ये INNOVERV मध्ये सल्लागार म्हणून काम करत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav gangulys daughter sana escapes unhurt after bus collision in kolkata aam