Sourav Ganguly’s ODI World Cup 2023 Prediction: एकदिवसीय विश्वचषक २०२३ ही स्पर्धा सुरू होण्याच्या दीड महिना आधी, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने या वेळी इतिहास रचणाऱ्या आणि विश्वविजेत्याची ट्रॉफी उंचावणाऱ्या संघाचे नाव उघड केले. सौरव गांगुलीने दीड महिन्यापूर्वी विश्वचषक विजेत्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने एकूण ५ संघांची नावे सांगितली आहेत, त्यापैकी एक संघ २०२३ च्या विश्वचषकाची ट्रॉफी जिंकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने २०२३ विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यासाठी पाच सर्वात मोठ्या दावेदारांची नावे सांगितली आहेत, ज्यात ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे. सौरव गांगुलीने एका कार्यक्रमादरम्यान २०२३ विश्वचषक ट्रॉफी जिंकणाऱ्या देशाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. सौरव गांगुली म्हणाला, ‘२०२३ विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया या टॉप-5 संघांमध्ये आघाडीवर असेल.’

सौरव गांगुली म्हणाला, “मला वाटते की ऑस्ट्रेलिया प्रबळ दावेदारांपैकी एक असेल. तुम्ही न्यूझीलंडकडे दुर्लक्ष करू शकत नाही. न्यूझीलंडचा संघ मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच चांगला खेळतो. भारत हा नेहमीच विश्वचषक स्पर्धेचा दावेदार राहिला आहे, पण याशिवाय इंग्लंड आणि पाकिस्तानवरही लक्ष असणार आहे. या ५ संघांपैकी यावेळच्या विश्वचषकात जो संघ सर्वोत्तम कामगिरी करेल, तो संघ ट्रॉफीवर कब्जा करेल. यावेळी जर तुम्ही मला माझ्या विश्वचषक विजयासाठी टॉप-५ स्पर्धकांबद्दल विचाराल, तर ते ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, भारत आणि पाकिस्तान आहेत.”

हेही वाचा – R Ashwin : न्यूझीलंडविरुद्ध UAE च्या विजयावर अश्विनच मोठं वक्तव्य; म्हणाला, “ही मोठी उपलब्धी आहे याने आम्हाला…”

एकदिवसीय विश्वचषक २०२३ कधी होणार सुरू?

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना १९ नोव्हेंबरला खेळवला जाईल. भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. २०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ५ ऑक्टोबर २०२३ रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. आतापर्यंत १२ हंगामामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने सर्वाधिक ५ वेळा विश्वचषक जिंकला आहे. याशिवाय भारत आणि वेस्ट इंडिजने २-२ वेळा आणि श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लंडने प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav gangulys prediction about the world cup 2023 told 5 teams as strong contenders for the title vbm