Sourav Ganguly on Asia Cup: आशिया चषक सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. याआधी सोमवारी २१ ऑगस्ट रोजी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली. त्याचबरोबर संजू सॅमसनला बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे. संघात अनेक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले, त्यात युजवेंद्र चहलला वगळण्यात आले तर तिलक वर्माचा संघात समावेश करण्यात आला. आता या संघाबाबत माजी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. रवी शास्त्री, सुनील गावसकर यांच्यानंतर आता बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीने टीम इंडियाबाबत सूचक विधान केलं आहे.

“आशिया चषकासाठी निवडलेल्या खेळाडूंपैकी काहींनी सहा महिने तर काहींनी वर्षभर एकदिवसीय क्रिकेट खेळलेले नाही, मात्र हा संघ केवळ आशिया चषकच नाही तर विश्वचषकही जिंकू शकेल,” असे गांगुलीला वाटते. पुढे तो म्हणाला की, “श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुलचे भारतीय संघात पुनरागमन झाले असून त्यामुळे संघाची मधली फळी मजबूत झाली आहे. त्याचवेळी बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनीही काही वर्षांपासून एकही वन डे सामना खेळलेला नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर शमी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हे एक आव्हान असणार आहे.”

Cricket Test series, India, bangladesh
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेवर बिघडलेल्या संबंधांचे प्रतिबिंब? पाकिस्तानप्रमाणेच भारतीय संघालाही बांगला खेळाडू चिथावणार का?
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
How Divya Deshmukh Wins with Match Winning Move in Just 17 seconds left on clock in Chess Olympiad
Chess Olympiad 2024: १७ सेकंद शिल्लक असताना दिव्या देशमुखने कशी मारली बाजी? निसटलेल्या सामन्यात अनपेक्षित चाल खेळून मिळवला विजय
Pratham Singh Scores Maiden Duleep Trophy Century for India A vs India D Match
Duleep Trophy 2024: शुबमन गिलच्या जागी आलेल्या ३२ वर्षीय बदली खेळाडूने झळकावले दुलीप ट्रॉफीतील पहिले शतक, जाणून घ्या कोण आहे?
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
IND vs BAN Test Series updates in marathi
IND vs BAN : भारत दौऱ्यासाठी बांगलादेशचा कसोटी संघ जाहीर! हत्येचा आरोप असणारा खेळाडू संघात कायम
PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका

गांगुलीला वाटते की, “रोहित शर्मा अँड कंपनी सर्वात मोठ्या मालिकेत विश्वविजेते बनण्यासाठी सज्ज आहेत.” माजी कर्णधार गांगुली पुढे म्हणाला, “हा खूप मजबूत संघ आहे, बुमराह संघात परतला असल्याने टीम इंडिया आणखी मजबूत झाली आहे. शमी, बुमराह, सिराज यापेक्षा चांगल्या गोलंदाजी आक्रमणची कोणीच अपेक्षा केली नसेल. तुम्हाला यापेक्षा उत्तम वेगवान गोलंदाजी आक्रमण मिळूच शकत नाही. स्पिनमध्ये, जडेजा आणि त्याच्या जोडीला एक रिस्ट स्पिनर गोलंदाज असेल आणि तो चांगली फलंदाजी देखील करेल. भारत एक मजबूत संघ आहे, त्यांना फक्त आशिया चषक आणि विश्वचषकात देखील चांगले आणि आत्मविश्वासपूर्ण क्रिकेट खेळण्याची गरज आहे.”

श्रेयसने शेवटचा वन डे सामना १५ जानेवारी २०२३ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्याच वेळी, राहुलने २२ मार्च २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. श्रेयसच्या मांडीला दुखापत झाली होती, तर राहुल मांडीच्या दुखापतीने आयपीएलमधून बाहेर पडला होता. या दोघांच्या पुनरागमनामुळे भारतीय मधली फळी मजबूत झाली आहे.

आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेद्वारे जवळपास वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या बुमराहने १४ जुलै २०२२ रोजी लॉर्ड्स येथे इंग्लंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्याच वेळी, प्रसिद्ध वेगवान गोलंदाज कृष्णाने २० ऑगस्ट २०२२ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला.

हेही वाचा: World Cup 2023: वर्ल्डकप तिकिटांबाबत मोठी अपडेट! २४ ऑगस्टपासून विक्री सुरू, कुठे खरेदी करायची? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आशिया कपसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा. बॅकअप: संजू सॅमसन

आशिया चषकाला ३० ऑगस्टपासून पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याने सुरुवात होणार आहे. यावेळी ही स्पर्धा ‘हायब्रीड मॉडेल’मध्ये होणार आहे. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानात खेळवले जाणार असून अंतिम सामन्यासह नऊ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. टीम इंडिया आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. ती २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना कँडी येथे होणार आहे.

हेही वाचा: ODI WC: चांद्रयान-३चे यशस्वी लँडिंग अन् टीम इंडियाचे वर्ल्डकप कनेक्शन, MIचे ट्वीट व्हायरल; म्हणाले, “आता भारत विश्वचषक…”

स्पर्धेतील पहिला सामना मुलतानमध्ये खेळवला जाणार आहे

स्पर्धेतील सहा संघांची प्रत्येकी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, यजमान पाकिस्तान आणि नेपाळ अ गटात आहेत. तर ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आहेत. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान येथे ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. त्याचवेळी, श्रीलंकेच्या भूमीवर पहिला सामना बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ३१ ऑगस्ट रोजी कॅंडीमध्ये होणार आहे.

भारताचे वेळापत्रक

भारतीय संघ २ सप्टेंबरला कँडीत पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर ४ सप्टेंबरला त्याच मैदानावर त्याचा सामना नेपाळशी होणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील आणि या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. यावेळी आशिया कप ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल. विश्वचषकापूर्वी संघांना त्यांच्या तयारीला अंतिम रूप देण्याची ही सुवर्णसंधी असेल.