Champions Trophy 2024 South Africa Squad Announced: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला फेब्रुवारीमध्ये सुरूवात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत सहभागी होणारे संघ आपापल्या संघांची घोषणा करत आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण ८ संघ सहभागी होणार असून त्यापैकी १२ जानेवारीपर्यंत ५ संघांची घोषणा करण्यात आली होती आणि आता दक्षिण आफ्रिकेने आपला संघ जाहीर केला आहे.

दक्षिण आफ्रिकेचे टी-२० आणि वनडेचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी ICC चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ १९ फेब्रुवारी ते ०९ मार्च या कालावधीत पाकिस्तान आणि दुबईमध्ये होणार आहे. टेम्बा बावुमा या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल. या संघात १० खेळाडू आहेत जे २०२३ च्या विश्वचषकात खेळले होते. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली होती.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? BCCIने सांगितली तारीख

दक्षिण आफ्रिकेचा संघ कसा आहे?

दक्षिण आफ्रिकेचे अॅनरिक नॉर्किया आणि लुंगी एनगिडी दुखापतीमुळे मोठ्या विश्रांतीनंतर संघात परतले आहेत. दुखापतीमुळे मायदेशातील संपूर्ण आंतरराष्ट्रीय हंगाम खेळू न शकलेले वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्किया ​​आणि लुंगी एनगिडी यांची दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय संघात निवड करण्यात आली आहे. नॉर्किया ​​हा पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याने बराच काळ बाहेर होता, तर लुंगी एनगिडीला मांडीला दुखापत झाली होती.

हेही वाचा – Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाचा १५ सदस्यीय संघ जाहीर! ‘हा’ स्टार खेळाडू करणार नेतृत्त्व

विआन मुल्डर, टोनी डी जॉर्जी आणि रायन रिक्लेटन प्रथमच आयसीसी स्पर्धेत खेळणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ब गटात दक्षिण आफ्रिका असून २१ फेब्रुवारीला कराचीमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात करतील. त्यानंतर २५ फेब्रुवारीला ते रावळपिंडी येथे ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळतील आणि त्यांचा अंतिम गट सामना १ मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध होईल. अ आणि ब गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

हेही वाचा – युवराज सिंहचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन पोहोचले होते घरी, स्वत: केला खुलासा; काय आहे नेमकं प्रकरण?

एडन मारक्रम संघाचा भाग असला तरी टेम्बा बावुमाला संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. एडन मारक्रमच्या नेतृत्त्वाखाली पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. पण मारक्रमच्या तुलनेत बावुमाचा वनडे सामन्यात कर्णधार म्हणून रेकॉर्ड चांगला आहे. बावुमाच्या नेतृत्त्वाखाली संघाने २०१८ ते २०२४ दरम्यान ३८ सामने खेळले आहेत, ज्यापैकी २१ सामने जिंकले असून १४ सामने गमावले आहेत. तर मारक्रमच्या नेतृत्त्वाखाली संघाने २०२१ ते २०२४ दरम्यान १४ सामने खेळले आहेत, ज्यापैकी ६ सामने जिंकले आहेत तर ८ सामने गमावले आहेत.

हेही वाचा – Abhishek Sharma : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूशी दिल्ली विमानतळावर गैरवर्तन, इन्स्टा स्टोरी शेअर करत व्यक्त केला संताप

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:

टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्जी, मार्को यान्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मारक्रम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्किया, कागिसो रबाडा, रियान रिक्झेलसी, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर डुसेन.

Story img Loader