३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी आज दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. फाफ डु प्लेसिसकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं असून, विश्वचषकासाठी आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने अनुभवी खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. हाशिम आमला, फिरकीपटू इम्रान ताहीर यांना संघात स्थान मिळालं आहे.
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ओव्हलच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे.
विश्वचषकासाठी असा असेल दक्षिण आफ्रिकेचा संघ –
फाफ डु प्लेसिस (कर्णधार), एडन मार्क्रम, क्विंटन डी-कॉक (यष्टीरक्षक), हाशिम आमला, रॅसी वॅन डर दसेन, डेव्हिड मिलर, अँडेल फेलुक्वायो, जे.पी. ड्यूमिनी, ड्वॅन प्रेटोरियस, डेल स्टेन, कगिसो रबाडा, लुन्गी एन्गिडी, अन्रिच नॉर्टजे, इम्रान ताहीर, तबरेज शम्सी