एकमेव टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करवा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना दहा षटकांचा खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात ६ बाद १०८ धावा केल्या. विजयासाठी १०९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १० षटकात ८७ धावा पर्यंत मजल करू शकला. त्यामुळे त्यांना २१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
दक्षिण आफ्रिकेकडून डिकॉकने २२, कर्णधार ड्यु प्लेसीस २७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने एक, अँड्रू टाय, नॅथन कूल्टर नाईल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ ८७ धावांपर्यत मजल मारू शकला. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने ३८ धावांची खेळी केली. मॅक्सवेल वगळता इतर फलंदाजाला आपल्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही.
South Africa end their innings on 108/6 in their reduced T20I game against Australia.
After rain earlier in the day, the match is now ten overs a side.
Will Australia be able to chase it down?#AUSvSA LIVE https://t.co/uDE129Ve5l pic.twitter.com/LEaBgvYqqy
— ICC (@ICC) November 17, 2018
South Africa beat Australia by 21 runs in a reduced 10 over game!
Tabraiz Shamsi was the Player of the Match for his economical spell of 1/12. #AUSvSA pic.twitter.com/ZHIn5W69YU
— ICC (@ICC) November 17, 2018