Australia Women’s National Cricket Team vs South Africa Women’s National Cricket Team Match Scorecard: महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. टी-२० विश्वचषकातील गट सामन्यांमध्ये अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विक्रमी सहा वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सुरूवातीपासूनच सामन्यात दबदबा राखत दक्षिण आफ्रिकेने ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. गतवर्षीच्या महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा पराभव केला होता. यंदा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला बाहेर करत दक्षिण आफ्रिकेने मोठा बदला घेतला आहे. २०२३ मध्ये, केप टाऊनमधील न्यूलँड्स येथे झालेल्या फायनलमध्ये सन लुसचा दक्षिण आफ्रिका मेग लॅनिंगच्या ऑस्ट्रेलियाकडून १९ धावांनी पराभूत झाला होता.

हेही वाचा – Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?

लॉरा वोल्वार्डच्या नेतृत्त्वाखालील महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचा बदला घेतला, ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली पायाच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर होती. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनेही महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला आठ सामन्यांमध्ये पराभूत केले. त्यांनी या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या सलग १५ सामन्यांच्या विजयी मालिकेला पूर्णविराम लावला.

हेही वाचा – IND vs NZ: भारताच्या वाताहतीला ‘हे दोन’ निर्णय कारणीभूत, रोहित शर्माच्या निर्णयाचा बसला मोठा फटका, तर विराट…

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १३५ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेने चांगली सुरूवात केली. कर्णधार सलामीवीर लोरा वोल्वार्ड हिने उत्कृष्ट ४२ धावांची खेळी केली तर ब्रिट्स १५ धावा करत बाद झाली. यानंतर सामनावीर ठरलेल्या अॅनेके बॉश हिने ४८ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ७४ धावांची शानदार खेळी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. विजयी चौकार लगावत बॉशने आफ्रिकेने अंतिम फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियाकडून सदरलँडला फक्त दोन विकेट घेता आले. याशिवाय ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी बाजू चांगली कामगिरी करू शकली नाही.

हेही वाचा – IND vs NZ: “विराटला ही जबाबदारी…”, कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला का पाठवलं? रोहित शर्माने केला मोठा खुलासा

दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १३४ धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताविरूद्ध सामन्यात चांगली कामगिरी करणारी ग्रेस हॅरिस या सामन्यात अपय़शी ठरली आणि ती ३ धावा करत बाद झाली. तर बेथ मुनीने उत्कृष्ट खेळी खेळत ४२ चेंडूत २ चौकारांसह ४४ धावांची चांगली खेळी केली. यानंतर वेयरहम ५ धावा करत बाद झाली तर ताहिला मॅकग्रा २७ धावा आणि एलिस पेरी ३१ धावा करत बाद झाली. त्यानंतर लिचफिल्डने १६ धावांचे योगदान देत ५ बाद १३४ धावांपर्यंत संघाला नेले. आफ्रिकेकडून अयोबोंगा खाकाने २ विकेट तर मारिजन काप आणि मल्बा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

टी-२० विश्वचशक २०२४ मधील उपांत्य फेरीतील दुसरा सामना न्यूझीलंड विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात उद्या म्हणजे १८ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यातील विजयी संघ २० ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध महिला टी-२० विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना खेळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africa beat australia women team by 8 wickets and enters finals of icc womens t20 world cup 2024 bdg