कर्णधार फाफ डय़ू प्लेसिसचे दमदार शतक (११२) आणि क्विंटन डी’कॉकच्या (८१) जिगरबाज अर्धशतकी खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी व ६७ चेंडू राखून धुव्वा उडवला.

इम्रान ताहीर व लुंगी एन्गिडीने प्रत्येकी तीन बळी मिळवत श्रीलंकेचा संघ ४७ षटकांत २३१ धावांत गुंडाळला. श्रीलंकेसाठी कुशल मेंडिस (६०) व ओशादा फर्नाडो (४९) यांनी उपयुक्त झुंजार खेळी केली. प्रत्युत्तरादाखल फलंदाजीस उतरलेल्या आफ्रिकेने ३८.५ षटकांत दोन फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी २३२ धावांचे लक्ष्य सहज गाठले.

Story img Loader