South Africa beat West Indies by 40 runs in 2nd Test match : दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ४० धावांनी विजय नोंदवला. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी ढेपाळलेली पाहायला मिळाली. ज्यामुळे वेस्ट इंडिज संघाला सामन्यासह मालिकाही गमवावी लागली. दुसऱ्या कसोची सामन्यात २६३ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा संघ २२२ धावांवर गारद झाला. यासह आफ्रिकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० ने जिंकली. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामन्यानंतर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बदल झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेला विजयानंतर गुणतालिकेत झाला फायदा –
वेस्ट इंडिजविरुद्धची मलिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पाकिस्तानच्या वर पोहोचला आहे. आफ्रिका सध्या डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेने ६ सामने खेळले असून त्यापैकी २ जिंकले आहेत आणि ३ गमावले आहेत. यामुळे त्यांची विजयाची टक्केवारी ३८.८९ आहे. तर पाकिस्तान संघ सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तानने आत्तापर्यंत पाच सामने खेळले आहेत, त्यापैकी २ जिंकले आहेत आणि ३ हरले आहेत. पाकिस्तानच्या विजयाची टक्केवारी ३६.६६ आहे. पाकिस्तानला अजूनही घरच्या मैदानावर बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. या सामन्यात विजय मिळवून पाकिस्तानी संघ अव्वल स्थानावर पोहोचू शकतो.
भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम –
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. संघाची विजयाची टक्केवारी ६८.५१ आहे. भारतीय संघाला अजूनही बांगलादेश, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर एकूण १९ कसोटी सामने खेळायचे आहेत, जे डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघाची विजयाची टक्केवारी ६२.५० आहे.
हेही वाचा – The Hundred 2024 : प्रथमच खेळला गेला ‘सुपर ओव्हर’पेक्षा लहान षटकाचा सामना, असा लागला ‘टाय मॅच’चा निकाल
डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबलमधील टॉप-५ संघ
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या २०२४-२५ सायकलच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६२.५० आहे. यानंतर न्यूझीलंड तिसऱ्या, श्रीलंका चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या विजयाची टक्केवारी ५०-५० आहे. तर दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी ३८.८९ आहे.