कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाच्या दिशेने दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीत दमदार पाऊल टाकले. २ बाद २३० वरुन पुढे खेळणाऱ्या आफ्रिकेने ५६९ धावांचा डोंगर उभारला आणि ऑस्ट्रेलियापुढे ६३२ धावांचे विक्रमी आव्हान ठेवले. या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद ४० धावा केल्या आहेत.
हशीम अमला आणि एबी डीव्हिलियर्स यांनी झळकावलेली शतके तिसऱ्या दिवसाच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले. दुसऱ्या दिवसअखेर ९९ वर नाबाद असलेल्या अमलाने जॉन्सनच्या गोलंदाजीवर एक धाव घेत आपले १८वे शतक पूर्ण केले. अनुभवी जॅक कॅलिसला ३७ धावांवर मिचेल स्टार्कने बाद केले. मात्र यानंतर अमला आणि
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा