पदार्पणाच्या सामन्यातच त्याच्यावर सामना वाचवण्याची वेळ आली.. समोर ऑस्ट्रेलियासारखा कट्टर प्रतिस्पर्धी त्यांच्याच मातीत विजयाचे स्वप्न पाहात होता.. चार फलंदाज फक्त ७७ धावांमध्ये बाद झाले होते आणि सामन्याच्या अखेरचा संपूर्ण दिवस खेळून काढायचा होता.. ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते.. पण जवळपास आठ तास किल्ला लढवत, तब्बल ३७६ चेंडूंचा सामना करत नाबाद ११० धावांची खेळी साकारत सामना अनिर्णित राखण्यात सिंहाचा वाटा उचलला तो दक्षिण आफ्रिकेच्या फॅफ डय़ू प्लेसिसने. त्याच्या या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पाचव्या दिवसअखेर ८ बाद २४८ अशी मजल मारत सामना अनिर्णित राखला. डय़ू प्लेसिसलाचा या वेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
डय़ू प्लेसिसला या वेळी ए. बी. डी’व्हिलियर्स (३३) आणि दुखापतग्रस्त जॅक कॅलिस (४६) यांनी त्याला चांगली दिली असली तरी त्यांना मोठय़ा खेळी साकारता आल्या नाहीत. हे दोघेही बाद झाल्यावर तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन डय़ू प्लेसिसने संघाला सामना अनिर्णित राखून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा