कर्णधार ग्रॅमी स्मिथच्या शानदार नाबाद १११ धावांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या आव्हानात्मक धावसंख्येला दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार प्रारंभासह प्रत्युत्तर दिले आहे.
स्मिथने आपल्या कसोटी कारकीर्दीतील २६वे शतक साकारले. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ५५० या धावसंख्येपुढे दक्षिण आफ्रिकेने २ बाद २१७ अशी मजल मारली. स्मिथच्या मागील २५ कसोटी शतकांच्या वेळी दक्षिण आफ्रिकेचा संघ जिंकला होता. स्मिथला आपल्या खेळीमध्ये दोनदा जीवदान मिळाले. दक्षिण आफ्रिकेसाठी स्मिथ आणि अल्विरो पीटरसन (५४) यांनी १३८ धावांची दमदार सलामी केली.
त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार क्लार्कने ४० चौकार आणि एका षटकारासह २५७ चेंडूंत २३० धावांची खेळी उभारली, तर माइक हसीने नऊ चौकार आणि चार षटकारांनिशी १०३ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून मॉर्ने मॉर्केलने १४६ धावांत ५ बळी घेतले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा