ऑक्टोबर महिन्यात परदेशात पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका बरोबरीत सोडविणारा संघच दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी कायम राखला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १८ डिसेंबरपासून जोहान्सबर्गला सुरू होणार आहे, तर दुसरी कसोटी २६ डिसेंबरपासून दरबनला सुरू होईल.
कसोटी मालिकेसाठी तयारी करण्याकरिता ग्रॅमी स्मिथला एकदिवसीय संघातून सूट देण्यात आली आहे. कारण स्मिथकडेच नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे.
या कसोटी संघात डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, व्हर्नन फिलँडर आणि रॉरी  क्लेनव्हेल्ट अशा चार वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे, तर रॉबिन पीटरसन आणि इम्रान ताहिर हे दोन फिरकी गोलंदाज आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ : ग्रॅमी स्मिथ (कर्णधार), हशिम अमला, ए बी डी’व्हिलियर्स (यष्टीरक्षक), जे पी डय़ुमिनी, फॅड डय़ू प्लेसिस, डीन एल्गर, इम्रान ताहिर, जॅक कॅलिस, रॉरी  क्लेनव्हेल्ट, मॉर्ने मॉर्केल, अल्विरो पीटरसन, रॉबिन पीटरसन, व्हर्नन फिलँडर, डेल स्टेन, थामी त्सोलेकिले (यष्टीरक्षक)

Story img Loader