पहिल्या एकदिवसीय अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अवघ्या एका धावेने पाकिस्तानवर विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा फलंदाजी करताना वेन पार्नेलच्या ५६ धावांच्या खेळीच्या जोरावर १८३ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या अव्वल तीन फलंदाजांना बाद करत द. आफ्रिकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची ४ बाद १६५ अशी अवस्था होती. पण त्यानंतर ३९ चेंडूंमध्ये १७ धावांत पाकिस्तानचा संघ १८२ धावांत तंबूत परतला.