चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागलेले दोन बलाढ्य संघ दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. श्रीलंकेमध्ये दक्षिण आफ्रिका आणि यजमान श्रीलंका दरम्यान एकूण पाच एकदिवसीय सामने होणार आहेत. दोन्ही संघांचा मालिकेवर विजय प्राप्त करुन संघाचा आत्मविश्वास वाढविण्यावर भर असणार आहे. मालिकेतील पहिला सामना उद्या शनिवार कोलंबो येथे रंगणार आहे. श्रीलंका संघाचे सध्याचे ग्रहमान बघता संघाला चांगली कामगिरी करण्यात जरी यश प्राप्त होत असले. तरी, नेमक्या महत्त्वाच्या सामन्यात संघाला परभवाला सामोरे जावे लागले आहे. नुकत्याच वेस्टइंडिजमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात भारताविरुद्धचा पराभव हे त्याचे उत्तम उदाहरण ठरेल.  
अँजीलो मेथ्यूजवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आल्यामुळे या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी दिनेश चंदिमाल संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा